गोष्ट भंगाराची
गोष्ट भंगाराची




"भंगारवाला$$$$$
तांबा, पितळ ,काच, प्लास्टिक, बाटली भंगार घेणार ssssss खालून अशी आरोळी आली आणि सुजाता एकदम जागी झाली.
जागी झाली म्हणजे काही ती झोपलेली नव्हती, पण गेल्या तीन-चार दिवस घरात भरपूर व्याप होता. नुकतच दोन दिवसापूर्वी तिच्या मुलाचे शेखरच लग्न झालं होतं.
त्यामुळे लग्नाआधी दोन दिवस ग्रहमख, देव देवक, हळद, या धामधुमीत गेले. आणि आता उद्याला सत्यनारायणाची पूजा, गोंधळ ,या गोष्टी होत्या. त्यानंतर ते दोघे जण मालदीव ला जाणार होते. मग सुजाताला ऊसंत मिळाली असती.
शिवाय नवीन सुनबाई कडून आलेले रुखवताचे सामान, आहेरातील भांडी , लोकांकडून आलेल्या गिफ्ट, या सगळ्या गोष्टींचा हॉलमध्ये पसारा होता.
नवीन सामान ठेवायला आधी पोट माळ्यावरून जुनं सामान खाली तर काढायला पाहिजे!
पण जेव्हा जेव्हा माळ्यावरून भंगार सामान खाली काढलं की
मग तो दिवस दिवस त्यातच जायचा. पूर्वी पण बऱ्याच वेळा भंगार घालण्याचा प्रयत्न असायचा, नवराबायको दोघे सामानाच सॉर्टिंग करत बसायचे.
"हे माझ, हे मला पाहिजे .
"ते तुझा आहे, तू बाजूला ठेव" ही माझ्या आईची आठवण आहे, ही आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची आठवण आहे ,असं करत करत अर्ध्या अधिक वस्तू बाजूला पडायच्या.
खरे तर या बाबतीत उलट होतं. तिच्या पेक्षा तिचा नवरा जास्त भावनिक होता. आणि या वस्तूंमध्ये गुंतत होता.
संसाराच्या या स्टेजला ती मात्र बऱ्यापैकी अलिप्त झाली होती. कोणत्याच गोष्टींचा मोह वाटत नव्हता. आज मोहन म्हणजे तिचा नवरा, तोही घरात नव्हता.
उद्याच्या पूजेसाठी जेवणाच कॉन्ट्रॅक्ट ,भटजी, हार-फुले सामान ,इत्यादीसाठी बाहेर गेला होता.
तेवढ्यात आपण मोका मारावा आणि पोटमाळ्यावर चं सगळं सामान काढून भंगारात देऊन टाकावं .असा विचार तिने केला.
तिने वॉचमनला हाक मारली, त्याला पोटमाळ्यावर चढवला आणि वरून भराभरा भंगार सामान खाली काढून घेतल. खाली उतरल्यावर त्याच्या हातावर पन्नास रुपये टिकवले ,आणि कल खाना खाने के लिये आना म्हणून देखील सांगितले.
तो देखील खुश होऊन गेला.
ती सामानाचा सॉर्टिंग करत होती, त्यामध्ये दोन लोखंडी पेट्या भरलेल्या होत्या. त्यामध्ये काय- बाय जुन्या वस्तू, अगदी विणकामाच्या सुया आणि साचा ,यापासून ते मुलांच्या खेळण्यातले भोवरे, विटी दांडू, लग्न होऊन गेलेल्या मुली ची भातुकली, खेळणी, भांडीकुंडी, इत्यादी इत्यादी होतं .
मामंजी चा एक जुना पुराना पितांबर ,सासुबाई ची फनी करंड्याची लाकडी पेटी, तांब्याचं घंगाळ हंडा कळशी पितळेच्या ताटल्या, वाट्या जुने पुराने कपडे ,सासुबाईंचे पैठणी नंतर सत्तावीस वर्षाच्या यांच्या संसारातील वस्तू कधीकधी एकमेकाला घेतलेल्या भेटवस्तू, ज्या जुन्या झाल्यावर माळ्यावर टाकून दिलेल्या,
यातल्या आठवणी.
कसं काय सगळे भंगार ला द्यायचं!
परत एकदा डोक्यात तेच.
तेवढ्यात शेखर आणि शान्वी मुलगा आणि सून बेडरूम मधून बाहेर आले.
आई काय हा पसारा मांडला आहेस?
अगं आलेलं सामान कमी आहे का ?
म्हणून अजुन वरचं सामान खाली काढून ठेवलंस? मुलगा वैतागला.
अरे आलेल्या सामान ठेवण्याची व्यवस्था करते आहे. त्यासाठी जून सामान भंगार मध्ये टाकून देते.
त्या आधी एकदा सगळं नजरेखाली घालते. एखादी महत्त्वाची वस्तू त्यात जाऊ नये कळलं?
तेवढ्यात शान्वीच लक्ष ह्या पसाऱ्या कडे गेलं .
आई! आई! काय करताय? पुन्हा एकदा तिला सारे रिपीट सांगावं लागलं.
त्यांना वाटलं होतं, ही काही या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेणार नाही .
पण झालं उलटंच,
ती, त्यांच्याबरोबर मांडी ठोकून बसली. जणू काय "मोहन" ची जागा सध्या ती चालवत होती. आणि प्रत्येक गोष्ट कसा अँटिक पीस आहे ,पुन्हा कसा मिळणार नाही ,असं सांगून ते बाजूला ठेवत होती.
मग त्यात भातुकलीचा खेळ होता, जुन्या गोट्या, विट्टी दांडू, भोवरा सगळं बाजूला काढून ठेवत होती.
अगं मग भंगारवाल्याला काय देऊ?
आई! काहीच देऊ नका.
या सगळ्या तुमच्या आठवणी आहेत.
फार तर त्याला म्हणावं ,या घरातल भांडण, हेवा दावा ,वाईट गोष्टी, वाईट दृष्टी, हे सारं घेऊन जा .
त्याचे हवे तर मीच तुला पैसे देते .
असं होत असतं तर! कोणत्या घरात तुला हेवेदावे आणि भांडण दिसली असती का? सगळ्यांनीच उचलून ते भंगारवाल्याला दिलं नसतं का ?असो
बाई ग मी "हरी पाॅर्टर " सिनेमात पाहिल्याप्रमाणे सगळ्या आठवणीच लिक्विड करून ते मेंदूत बसवलेल आहे. मला पाहिजे तेव्हा बघू शकते. आता या वस्तू जाऊ देत. तरच तुझ्या कडून आणलेल सामान माळावर बसेल.
आई त्यापेक्षा आपण अजून एक मोठा फ्लॅट घेऊया!
अग तो घेऊ ,तेव्हा घेऊ. आता या सामानाचं काय करायचं ?असं करत त्यांनी बऱ्याच गोष्टी तिच्या हातून सोडवल्या आणि भंगारवाल्यासाठी बाजूला काढले तेवढ्यात त्यांच्या हातामध्ये एक नक्षीकाम केलेले पितळेचे तबक आलं, त्याच्यावरची धूळ पुसली तर त्याच्या वरती मीना काम केलेली अन्नपूर्णेची सुरेख मूर्ती होती .
त्यामुळे "तबक" काही देण्याची त्यांना इच्छा झाली नाही.
तेवढ बाजूला ठेवून,
बाकीचं सामान त्यांनी बाजूला काढले.
आणि भंगारवाल्याला वरती बोलावलं .
तो खाली थांबलाच होता. तो लगेच लगबगीने वरती आला. सुनेच्या तावडीतून वाचवलेल सामान, त्यांनी भंगारवाल्याला दिल.
तेवढेच सामान घरातलं कमी झालं असं म्हणतात ना! की मोडक्यातोडक्या टाकाऊ वस्तू घरात ठेवू नये. त्याने निगेटिव ऊर्जा तयार होते. म्हणून त्या देऊन टाकलेल्या बऱ्या.
ज्या गोष्टी वर्षानुवर्षे माळ्यावर धूळ खात पडलेल्या आहेत.
तुम्ही वापरलेल्या नाहीत त्या खुशाल देऊन टाकाव्यात.
पण या नव्या पिढीचे मत थोडं वेगळं होतं.
सुनेला काही गोष्टी अँटिक पीस म्हणून आवडल्या होत्या .तर शेखर च म्हणणं होतं भंगारवाल्याला देण्यापेक्षा रिपेअर करून गरीबा गुरिबांना फुकट देऊन टाक.
अहो आई माझी एक ओळखीची संस्था आहे "दाता" नावाची जी संस्था आपल्याकडून अशा वस्तू घेते ,आणि रिपेअर करून गरिबांना देऊन टाकते..
आपण तिला दान करूया मग मात्र त्यांनी मनात ठरवलं इथून पुढे कोणतीही वस्तू भंगार ला द्यायची नाही तर ती गरजवंत माणसाला द्यायची.