गड किल्ले
गड किल्ले


गड किल्ले ही आपल्या महाराष्ट्राची शान किंवा गड किल्ल्या साठीच महाराष्ट्र ओळखला जातो उत्तर भारतात भुईकोट किल्ले बघायला मिळतात राजस्थान मध्ये देखील जमिनीवरचे किल्ले बघायला मिळतात पण असे उंच उंच डोंगरावरती बांधलेले व कडे तासलेलेत असलेले किल्ले आपल्या महाराष्ट्रातच बघायला मिळतात
भौगोलिक परिस्थितीचा कसा फायदा घ्यावा याची शिवाजी महाराजांना पुरेपूर जाण होती एखाद्या किल्ल्यावर वर्ष दोन वर्षाची बेगमी करून ठेवली की की तो किल्ला पुढे अजून दोन वर्षे तरी लढवता यायचा व सहजासहजी शत्रूच्या हाती पडायचा नाही चांगले चांगले बेलार्क डोंगर बघून राजाने त्या वरती किल्ले बांधले त्यावेळी दक्षिणेमध्ये ज्यांचे किल्ल्यांवर राज्य त्यांचे प्रदेशावर राज्य असे समीकरण होते आजच्या घडीला देखील महाराष्ट्रात एकूण 496 किल्ल्यांची यादी आहे आपल्याला फार फार तर मुख्य मुख्य किल्ल्यांची नावे माहिती माहिती आहेत उदाहरणार्थ राजगड रायगड शिवगड पन्हाळगड विशाळगड सिंहगड शिवनेरी प्रतापगड तोरणा इत्यादी पण असे छोटे-मोठे किती जरी किल्ले महाराजांनी बांधलेले आहेत त्यापैकी थोडेसे वानगीदाखल चंदन वंदन खेळणा पाळणा महिमानगड वर्धनगड लोहगड आणि भरीत त्यात अजून एक जलदुर्ग म्हणजेच सिंधुदुर्ग महाराजांची दूरदृष्टी अशी होती की एक एक गड एक एक वर्ष मांडवी ला लढवला तरी तीनशे वर्षात आपला मुलुख शत्रूच्या हाती लागणार नाही आणि शेवटचा पर्याय म्हणजे जरी सगळ्या महाराष्ट्र पडला तरी तिकडे दक्षिणेकडे जिंजी हा दुसरा रायगडचा उभा केला होता आणि आणीबाणीच्या वेळी राजाराम महाराजांना त्याचा उपयोग देखील झाला
या घर किल्ल्यांवरील एक दगड एकेक चिरा तिथल्या पराक्रमाच्या शौर्याच्या कहाण्या आपल्याला सांगतात फक्त त्यासाठी प्रचंड राष्ट्राभिमान आणि बघण्याची नजर या दोन गोष्टी पाहिजेत
नाही तर कित्येक तरुण-तरुणी या ऐतिहासिक वास्तू मध्ये जाऊन आपल्या नावाची निशाणी तेथे लावून येतात जसं काही त्यांना वाटतंय की आपण आता या गडाला प्रमाणेच चिरंजीव अमर झालो
झाडांचे संवर्धन
गड किल्ल्यांचे संवर्धन हा एक मोठा गंभीर प्रश्न आहेतिकडे उत्तरेकडे जा किंवा इकडे दक्षिणेकडे जा त्या त्या राज्यांनी आपल्या राज्यांचे वारसे व ऐतिहासिक गोष्टी एकदम जिवापाड जपलेल्या आहेत व्यवस्थित ठेवलेले आहे त्या गोष्टींना तिकीट लावून पर्यटन स्थळ बनवले आहे त्यामुळे त्याचा मेंटेनन्स देखील निघतो
जर आपल्या महाराष्ट्रात या मुख्य मुख्य किल्ल्यांचे डागडुजी करून संवर्धन केले व त्यांना जोडणारी बस सेवा दिली म्हणजे फक्त किल्ल्यांची भ्रमंती व त्यासाठी तिकीट आकारणी केली तऱ्या गड-किल्ल्यांचा संवर्धनाचा पैसा पण निघेल व गड-किल्ले सुरक्षित राहतील आपला महाराष्ट्र सहजासहजी मुसलमानांच्या किंवा इंग्रजांच्या ताब्यात सापडला नाही त्याचे कारण हे गड किल्ले होत महाराष्ट्र ताब्यात आल्यानंतर इंग्रजांनी प्रथम काय केलं तर आपल्या गडावरील बांधकामे उध्वस्त करून टाकली असो
तिकडे राजस्थान मध्ये राजवाड्यात प्रवेश फी शंभर रुपये ताजमहालाची प्रवेश ती त्याहून जास्त भूतानमध्ये मॉनेस्ट्री बघायला पाचशे रुपये प्रतिमाणसी नेपाळमध्ये किल्ले बघायला शंभर रुपये प्रति माणसी आणि आपल्या महाराष्ट्रात मात्र साऱ्या गोष्टी फुकट उलट तिकडे जाऊन नासधूस करतात फुकट मिळाले की माणसाला त्याची किंमत राहत नाही त्यापेक्षा शुल्का करून किल्ल्यांची डागडुजी करा लोक दिवसभर किल्ल्यावर राहतील किंवा वस्तीला राहतील अशा सोयी करा मुलांना गार्डन मोठ्यांना करमणुकीची साधने त्याच्या किल्ल्याच्या माहितीची डॉक्युमेंटरी लाईट आणि साऊंड चे शो इत्यादी सारखे करा आणि मग बघा जगभरातील पर्यटक आपले गड किल्ले पाहण्यासाठी कसा ओघ लावतील