गाव परंपरा संस्कृती आणि ...?
गाव परंपरा संस्कृती आणि ...?


माझ्या माहिती परिमाणे जर पाहायला गेले तर आजच्या जीवनकाळात अनोखं राहणीमान, भाषा, परंपरा, खाद्य संस्कृती आणि कपडे यामुळे अनेक देश कुतूहलाचा विषय ठरतात. जगातील सर्व देशांतील राहणीमान आणि खाण्याच्या सवयींमध्ये फरक आपल्याला दिसतोच. परंतु असे म्हटले जाते ना कि एखाद्याच्या पेहराव्यावरून त्याचा देश कोणता याचा अंदाज लावला जावू शकतो. पण येथे तर तुम्हाला कोणाच्याही शरीरावर कपडे दिसणार नाहीत. पण जगात असे देखील एक गाव जिथे लोक कपडे घालतात नाही आणि विवस्त्र राहतात, ते पण संपूर्ण आधुनिक जीवन शैलीसह.
मी तुम्हाला आज अश्याच एका गावाविषयी सांगणार आहे. ते ठिकाण आहे ब्रिटनच्या ब्रिकेटवुड जवळ असलेलं ‘स्पीलप्लाट्ज’ नावाचं गाव. स्पीलप्लाट्जचं वैशिष्ठ्य म्हणजे या गावातले लहान-मोठे, म्हातारे, तरुण, स्त्री-पुरुष कोणीही कपडे घालत नाहीत. ऐकायला थोडं अश्लील वाटेल पण या मागचं कारण थोडं वेगळं आहे मित्रांनो.
तसे जर पाहायला गेल तर तेथील किमया ही थोडी वेगळीच आहे, कारण निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाशी एकरूप होण्यासाठी अशी जीवन पद्धती अंगिकारली असल्याचं इथे राहणारे लोक म्हणतात. गेल्या ८५ वर्षापासून इथले प्रत्येक वृद्ध कपडे न घालता विवस्त्र जीवन जगतायत. तसे गावची ही प्रथाच आहे म्हणा. या गावचा शोध १९२९ साली इसुल्ट रिचर्डसन लावला होता. त्यानंतरच इथल्या लोकांनी विवस्त्र जीवन जगण्याचं ठरवलं असल्याचं म्हटलं जातं मित्रांनो.
जर तुम्हाला वाटत असेल, की अशा त्यांच्या राहणीमानामुळे इथले लोक आधुनिक जगापासून तुटलेले आहेत का ? तर तसे अजिबात नाही. या गावात पब, बंगले, स्विमिंग पूल वगैरे सगळं अत्याधुनिक आहे मित्रांनो.
आता तुम्ही म्हणाल की थंडीतही विवस्त्र कसे राहत असतील हे लोक ? तर त्याचं असं आहे की थंडी मध्ये कपडे घालण्याची या लोकांना मुभा देण्यात आली आहे.
तर मित्रांनो इथे जर तुम्हाला पर्यटक म्हणून जायचं असेल तर तुम्हालाही इथे विवस्त्रचं राहावं लागेल. अशी या गावाची परंपराच आहे म्हणा... या गावात अनेक पर्यटक येत असतात आणि भाड्याने घर घेऊन राहतात. इथे जरी बाहेरची माणसे येऊन विवस्त्र राहत असली तरी गावाच्या नियमांचे त्यांना काटेकोर पालन करावे लागते.
कशी वाटली आजची कथा तुमि मला कंमेंट करून कळवा ...
जगामध्ये असे अनेक अनोखी आणि विचित्र शैली पाहायला मिळतातच त्यातलाच हा एक अनोखा गाव जिथे सर्व पुरुष असो या स्त्री सगळे विवस्त्रच दिसतील मित्रांनो...
अस हे त्यांच गाव, परंपरा आणि संस्कृती.....