STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

4.8  

Jyoti gosavi

Others

दुष्काळ एक समस्या

दुष्काळ एक समस्या

2 mins
1.2K


आपल्याकडे अशी म्हणच आहे की "पावसाने बडवलं, आणि नवऱ्याने तुडवलं" तर कोणाला सांगायचं? 

किंवा "अस्मानी आणि सुलतानी "अशा म्हणींचा अर्थ बरच काही सांगून जातो

  

दुष्काळाची समस्या आजकाल फारच भेडसावत आहे कधी कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ कधी अतिवृष्टीमुळे पिके कुजून जातात 

तर कधी पाऊस नसल्यामुळे वाळून करपून जातात त्या वरती कर्जमाफी करणे ही वरवरची मलमपट्टी आहे आहे त्यामुळे मूळ समस्या दूर होत नाही

आमच्या लहानपणी नदी नाले ओढे भरून वाहत असायचं मग आताच असं काय झालं की नदी नाल्यांमध्ये थेंबही उरत नाही माणसाची हाव त्याला कारणीभूत आहे माणसाला निसर्गातला मी किती ओरबाडू आणि किती नको असं झालंय हळद कापूस ऊस यासारख्या नगदी पिकांमुळे अतिशय पाणी बरबाद होते शिवाय जमिनीची वाट लागते नदी ओढ्यांमध्ये सरळ इंजिन टाकून शेतीला अनाधिकृतपणे पाणी घेतात आणि मग नदीत पाण्याचा थेंब देखील उरत नाही.

शिवाय नेहमीची पर्यावरणाची समस्या जंगल तोड डोंगर फोड या सार्‍या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत त्यामुळे पाऊस पडत नाही वातावरण बदलामुळे निर्माण होणारे वादळ अतिवृष्टी पण करतात आणि या दोन्ही गोष्टींमुळे दुष्काळाची समस्या निर्माण होते

दुष्काळाला गृहीत धरूनच शेतीचे पाण्याचे नियोजन केले पाहिजे पूर्वी शेतकरी मृग नक्षत्रावर पेरणी करायचा पण ती आता पाउस बघून त्या अंदाजाने केली पाहिजे

पाण्याचा अतिउपसा करण्यापेक्षा पाण्याचा थेंब आणि थेंब जिरवला पाहिजे ठिबक सिंचन, स्प्रिंकल वापरले पाहिजे

अन्नधान्याची व्यवस्थित साठवण केली पाहिजे

एकच पीक न घेता आलटून पालटून वेगवेगळी पिके घेतली पाहिजेत

पाण्याचे नियोजन माथा ते पायथा असे केले पाहिजे डोंगर उतारावर चर खोदून त्यात पाणी जिरवले पाहिजे

प्रत्येकाने असा पण केला पाहिजे की घरात मूल जन्माला आल्यावर ते पाच वर्षाचे होईपर्यंत दरवर्षी एक देशी झाड लावीन व त्याचे पाणी घालून संगोपन करेन

शेतकरी राजाने स्वतःची मानसिकता खंबीर केले पाहिजे


ऐका मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगते खास कसा शेतकऱ्याच्या गळ्याभोवती फास बसला

पाऊस पाणी झालं नाही गळून गेली कपास

शेतकऱ्याचा अडकला वरच्यावर श्वास

सरकारने पॅकेज दिले बळीराजा करता खास त्याच्या पर्यंत पोहोचला एखादाच घास

म्हणून बसल्या शेतकर्‍याच्या गळ्याभोवती फास

कर्जावर चढल कर्ज

व्याजावर वाढलं व्याज

म्हणून बसला शेतकऱ्याच्या गळ्याभोवती फास

शेवटी दुष्काळ शेतकऱ्याच्या आत्महत्या पर्यावरण जंगल तोड डोंगर फोड समुद्रात भराव टाकून घरे बांधणे हे सारे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

गिव्ह अँड टेक हा माणसांचा नियम निसर्गाला देखील लागू आहे, तुम्ही त्याला भरभरून द्या. संवर्धन करा. होय तुम्हाला भरभरून देईल तुम्हाला कधीच दुष्काळ बघण्याची वेळ येणार नाही


Rate this content
Log in