Yogesh Khalkar

Others

3  

Yogesh Khalkar

Others

दुसरा दिवस 26 / 03 / 2020

दुसरा दिवस 26 / 03 / 2020

1 min
580


आज पूर्ण घरी राहण्याचा दुसरा दिवस. सकाळी उठताना जरा निवांतपणा होता. उठून आवरून सावरून झाल्यावर बाहेर गॅलरीत बसलो तर एक दृश्य दिसलं. आमच्या गॅलरीत एक चिमणी घरटं बनवत होती. चिमणी खरंच एक कष्टाळू पक्षी आहे. चिमणी घरटं बनवत असताना एकेक काडी, गवत आणत होती. त्यापासून ती घरटंं बनवत होती. असं करता करता तिने दुपारपर्यत छान छोटेसे घरटे बनवले होते. तिची ही धावपळ पाहून तिला एक बशीभर पाणी देण्याचे ठरवले. पाणी तिच्यासमोर ठेवल्यावर तिने चोचीने थोडेसे पाणी घेतले. शेवटी ती आमच्या घरातली एक छोटी पाहुणी होती ना??


Rate this content
Log in