Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

दिवाळ सण

दिवाळ सण

2 mins
93


  दीपावली, दीपावली म्हणजे दिव्यांचा सण, ..... 

 घराला तोरण, दारापुढे रांगोळी, गड, किल्ला यांचे स्मरण म्हणून त्यांची प्रतिकृती मावळे ,शिवराय गडावर , किल्ल्याचे ठेवून सन्मान  करतो. हिरवळीने सजावट करतो. 

  फार पूर्वीच्या काळी घरासमोर सडा रांगोळी घालून पहाटे ,पहाटे उठून अभंग स्नान केले जायचे. अभ्यंग स्थान म्हणजे घरात बनवलेलं उटणं, सुगंधी वनस्पतींनी बनवलेले हे उटणं शरीराला लावायचं याचं कारण हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी पडते .त्वचेला या उटण्याने मऊपणा येतो आणि म्हणून हे उटणे पूर्वीपासून लावतात. आजही काही घरांमध्ये हे उटणे पाहायला मिळते .

   पूर्वी घराघरात उटणे बनवले जायचे आता तयार बनवलेले उटणे घराघरांमध्ये वापरतात. उटणे प्रत्येक घरामध्ये वापरतीलच असं नाही, तर उटण्याचा वासाचा फेसवॉश देखील मिळतो. अनेक प्रकारच्या सुगंधी द्रव्यांनी तयार झालेलं फेसवॉश सारखे साहित्य सुद्धा हल्ले बाजारामध्ये मिळतं आणि त्याचा वापर या सुगंध द्रव्यासारखा उटणे म्हणून केला जातो.      

    आता फराळाचे पदार्थ पूर्वी घराघरांमध्ये दिवाळी म्हटलं की पहिलं महिनाभरापासून तयार असायची. अनारश्याच पीठ त्याची तयारी, भाजणे, भाजणीचे दळण आणून ठेवणं भाजणी भाजून ठेवणे त्याचबरोबर कडबोळी चकली भाजणीचं थालीपीठ या सगळ्यांची महिनाभरापासून तयारी असायची.        नंतर तेल भरून ठेवलेले असायचं. सामान भरून ठेवलेला असायचं पण हे सगळं करताना घरातले सगळे एकत्र येऊन किंवा वाडा संस्कृतीमध्ये वाड्यातल्या सगळ्या बायका एकत्र येऊन आज या बाईचं केलं तर, उद्या तिचं करायचं .असं करत सगळ्यांचं पदार्थ छान तयार व्हायचे .

   हल्ली काय झालं नोकरी करणारी स्त्री आहे. आणि नोकरी करण्याच्या स्त्रीला घर कामामध्ये एवढा वेळ मिळत नाही त्यामुळे ही स्त्री बाहेरचे दिवाळीचे पदार्थ मागवण्यावर भर असतो. तिचा आणि तिचे हे बरोबरच आहे तिला नाही वेळ मिळाला हे मी माझ्यावरून सिद्ध करते. मला एवढा वेळ मिळत नाही पण तरीसुद्धा माझ्याच हातचा पदार्थ हवा म्हणून शंकरपाळी, चकली तर मीच बनवते. जेवढा जसा वेळ मिळेल तसे पदार्थ करायचे .पण हल्ली सर्व बाजारात तयार मिळतंय बाराही महिने मिळते म्हटल्यानंतर ह्या दिवाळीचे महत्त्व तसे जरा कमी झालेले आहे . ही नोकरी करणारी स्त्री बाहेरचे पदार्थ मागवण्याकडे तिचा कल असतो पण पूर्वीसारखं जरी अगदी तसंच परंपरागत संस्कृती नाही जगता आली तरीसुद्धा लक्ष्मीपूजन ला मात्र घराघरातला प्रत्येक माणूस पहाटे उठणार ,दिवाबत्ती करणार लक्ष्मीपूजन ची तयारी करणार. लक्ष्मीपूजन ला तरी सगळे घरातले एकत्र गुण्यागोविंदाने एकत्र येऊन सण साजरा करतात .कारण नोकरी करणार ना लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा या तीन दिवसांना सुट्टी असते. ह्या त्यांनी या तीन दिवसांमध्ये कुटुंबाचे भरपूर काही व्यवस्थित सण साजरे केले जातात. यामुळे आपण हे सण साजरे करून छान साजरे करू शकतो.

  दिवाळ सण मोठा

  नाही आनंदा तोटा.....

सर्वजण एकत्र येवून गुण्यागोविंदाने सण साजरे करण्यातच मजा आहे.हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला समजावून दिले आहे.


Rate this content
Log in