Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

धनुर्मास

धनुर्मास

3 mins
631


धनुर्मास डिसेंबरचा मध्य आणि जानेवारी चा पहिला पंधरावडा साधारण या कालावधीमध्ये सूर्याचे भ्रमण हे वृश्चिक राशी तुं धनु राशीमध्ये होते त्याला धनुर्मास किंवा 22 असे म्हटले जाते हा कालावधी दक्षिणा येणार हेमंत ऋतूमध्ये येतो. नवग्रह पैकी सूर्य हा त्यांचा राजा मानला जातो तो प्रत्येक महिन्यात एका राशीमध्ये तीस दिवस असतो मात्र आधीच वर्षातून एकदा मात्र एका महिन्यात सूर्याचे शून्य संक्रमण असते. त्याला अधिक मास असे म्हटले जाते, त्या राशीत असेल त्या नावाच्या राशी ने संक्रांति म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांति म्हटले जाते किंवा सूर्याच्या या संक्रमणाला  संक्रांति म्हणून ओळखले जाते.आणि भोगी दिवशी धनुर्मास संपतो. म्हणजेच संक्रांतीच्या आदल्या दिवशी धनुर्मास संपतो.त्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.तिथे सूर्याचे उत्तरायण सुरू होते असे मानले जाते.परंतु  ग्रेगरियन कॅलेंडर प्रमाणे 21 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण मानले जाते. याला धनुर्मास किंवा झुंझुर मास असे देखील म्हटले जाते.

या शब्दामागे मला असे वाटते की भल्या पहाटे उठून करण्याचे हे व्रत आहे. आपण सकाळच्या वेळेला "झुंजूमुंजू झालं" हा शब्द वापरतो, त्याप्रमाणे ह्याला झुंजुरमास असे म्हणत असतील.

यावेळी हवेमध्ये प्रचंड गारठा असतो. पौराणिक मान्यतेनुसार असे मानले जाते की, दक्षिणायन म्हणजे सहा महिने देवांची रात्र असते ,आणि उत्तरायणामध्ये सहा महिने देवांचा दिवस असतो.आणि धनुर्मास किंवा झुंजुर मास हा देवतांचा ब्रह्म मुहूर्त. म्हणजेच देवतांची पहाट मानली जाते.

या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही . लग्न, साखरपुडा, मौजीबंधन, वास्तुशांत, असे काहीही केले जात नाही.कारण त्याचे फलित मिळत नाही असे सांगितले जाते.मात्र या महिन्यांमध्ये सूर्य उपासना केलेली चालते .हा महिना हा देवतांना समर्पित असतो.या महिन्यांमध्ये विशेषता श्रीविष्णू श्रीकृष्ण आणि सूर्य देव यांचे पूजन केले जाते.अध्यात्मिक प्रगती होण्यासाठी हा कालावधी योग्य मानला जातो.

वैज्ञानिक दृष्टीकोन या कालावधीमध्ये पहाटेच्या वेळेला ओझोन साथर अतिशय शुद्ध असतो त्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण भरपूर असते वातावरण उत्साहवर्धक असते त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांसाठी हा कालावधी परभणी ठरतो आरोग्य आणि अध्यात्म या सर्वांचा संयोग या महिन्यात होतो आरोग्य आणि अध्यात्म किंवा धार्मिक गोष्टी हातामध्ये हात घालून चालतात झुंजुर माता चे व्रत महिनाभर करावयाचे व्रत आहे यामध्ये भल्या पहाटे उठून स्वयंपाक करावयाचा आणि सूर्योदयाला सूर्य देवतेला नैवेद्य अर्पण करून मगच आपण भल्या पहाटे जेवावयास बसायचे


पौराणिक मान्यता


 पौराणिक मान्यतेनुसार या महिन्यांमध्ये महापद्म आणि करकोटक या नावाचे दोन नाग, आप आणि वात या नावाचे दोन राक्षस, ताक्ष्य्र आणि अरिष्टनेमी या नावाचे दोन यक्ष, अंशू आणि भग या नावाचे दोन आदित्य, चित्रांगद आणि अरुणायु या नावाचे दोन गंधर्व, सह आणि सहस्या या नावाच्या दोन अप्सरा, ऋतू आणि कश्यप या नावाचे दोन ऋषी ,सूर्याच्या रथा बरोबर मार्गक्रमणा करत असतात .

याला शून्य  मास असे देखील म्हणतात, त्यामुळे या मासातील शुभ कार्यक्रम करता येत नाहीत केल्यास त्याचे फलित चांगले मिळत नाही असे ज्योतिषी सांगतात .

मात्र इतर सातही ग्रहांचे दोष निवारण करण्याची शक्‍ती सूर्यामध्ये असल्यामुळे, या कालावधीमध्ये सूर्य उपासना करावी.


आहार

या आधीच सांगितल्याप्रमाणे हे महिनाभर करावयाचे हे व्रत आहे .भल्या पहाटे उठून सकाळी बाजरीची तीळ लावलेली गरमागरम भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा, गुळाच्या पोळ्या, सर्व भाज्यांची एकत्र लेकुरवाळी भाजी, तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी, त्यावरती तुपाची धार, असा मेनू करून स्वतःच्या शेतामध्ये किंवा जवळील वनांमध्ये जाऊन वनभोजन करावे .तत्पूर्वी सूर्याला अर्घ्य द्यावे .

मंडळी आता कित्येक लोकांना धनुर्मास हा शब्द देखील माहीत नसेल.तो कधी आला कधी गेला याबद्दल कोणाला कल्पना नसेल.आणि प्रत्येक जण आपल्या पोटापाण्याच्या मागे धावत असल्यामुळे, लोकांना वेळ देखील नसतो.परंतु माझ्या मते एखादा दिवस फॅमिली पिकनिक प्रमाणे, वरील साऱ्या गोष्टी घरांमध्ये तयार करून जवळच्या एखाद्या शेतामध्ये, जंगलामध्ये, जाऊन वनभोजन करण्यात हरकत नाही. किंवा घरातल्या घरात एखाद्या सुट्टीच्या दिवशी या कालावधीमध्ये गरमागरम मेनू तयार करून आपल्या घरातील मंडळींना देखील आस्वाद घेण्यास द्यावा.आणी धनुर्मास म्हणजे काय असतो? हे आपल्या घरातील मुलांना माहीत करून द्यावे.


Rate this content
Log in