STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Children Stories Inspirational

4  

Mrs. Mangla Borkar

Children Stories Inspirational

देवाचा मित्र

देवाचा मित्र

1 min
405


एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली.


त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणा

ला, “”काका, तुम्ही देव आहात का?‘‘

या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, “”अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘

मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, “”काका – तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘

मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार,

हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला.


संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. देवाचा मित्र व्हा.


Rate this content
Log in