Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

देव

देव

1 min
163


    *देव म्हणे माणसातच असतो. आहे का हो हा देव खरेच माणसांमधे? मला तर असे अजिबातच वाटत नाही. काही देव तर काही दानवही आहेत पृथ्वीवर. देव म्हणजे आचरण शुद्ध, शुद्ध -नम्र वाणी, मदतीची भावना, चारित्र्य शुद्ध..अशा गोष्टी ज्या माणसात तो देव असे आपणच मानतो. या अगदी अल्प माणसात दिसतात.* 

   *पण दानव म्हणजेज राक्षसी प्रवृत्ती अनेकमाणसात दिसून येते.*

*रस्त्यावरून जाताना अपघात झालाय तो पाहतील पण मदतीला पुढे येणार नाहीत. वैर एवढे करतील की त्या व्यक्तीला तगदी नामशेष करून रिकामे होतील.* *घरातही असा दबदबा की त्यांचे स्वतःचे कुटुंबही त्यांना खूप घाबरते.*

  *अशी ही दानवीप्रवृत्ती माणसात नसावी. अगदी छान सरळ जीवन आनंदाने जगावे. देव होवू नका पण राक्षसासारखे वागूही नका..,*

   *देव खरेचच माणसात असतो याची एक ,दोन उदाहरणे देते.*

  *उदा...मी देव पाहिला म्हणतो. हेकाय असते बरं! ही आपली मनाची एक अत्तरकुपी आहे. तिथे श्रद्धेचा निवास आहे. आपुलकीची भावना आहे. आचरण ,वाणी नम्र व शुद्ध आहे*

   *माझी साईंवर भक्ती आहे आणि संकटसमयी आपल्या पाठीवर हात त्यांचाच असतो. भक्तीमुळे, श्रद्धेमुळे आपण नामस्मरण करतो व आपल्याला संकटसमयी त्या भक्तीची प्रचिती येते. आपले दुःख हलके होते. याचा प्रत्यक्ष अनुभव आला असल्याने मी हे सदर लिहीत आहे. खरंचंच भक्तीमार्गाचा अवलंब फार पूर्वीपासून मानव करीत आहे. साधूसंतांनी सांगितलेल्या भक्तीची मनोभावे याचना केली तर आपली कामे सुरळीत होतात. पण याचबरोबर आपल्याला मेहनतही करायला हवी. मेहनत, भक्ती, खरेपणा यामुळे मानव जगतात हवे ते मिळवतो...*


Rate this content
Log in