Jyoti gosavi

Others

4.0  

Jyoti gosavi

Others

देव जरी मज कधी भेटला

देव जरी मज कधी भेटला

1 min
248


देव जरी मज कधी भेटला हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर सुलोचनाबाई उभ्या राहतात .अगदी ते गाणे त्यांनी अजरामर केले आहे. आईची माया ,मुलासाठी तळमळणं आणि मुलाने पुढे आईला मोलकरीण म्हणून दाखवणे हे सगळे नातेसंबंध त्यांचा सोज्वळ चेहरा ,आणि ग दि माडगूळकर यांचे गीत या सगळ्याची एक छान भट्टी जमलेली आहे.

माणसातला देव तर आपण पाहतोच पण मी आज खरोखर देव मला भेटला तर काय होईल किंवा मी काय मागणे मागेन याचा परामर्श घेणार आहे.

खरोखरी देव मला भेटला आणि काय हवे ते माग म्हणाला तर मी त्याच्याकडे अखंड हिंदुस्थान मागेन.

माणसा माणसा मधला द्वेष हेवेदावे नष्ट होऊन एक अखंड हिंदुस्तान सुखेनैव नांदावा यासाठी प्रार्थना करेन.

 छत्रपती शिवाजी महाराज, थोरले श्रीमंत बाजीराव पेशवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक  ज्यांनी सतत देशावर प्रेम केले आणि देशापुढे स्वतःचे सुख देखील तुच्छ मानले अशा विभूती पुन्हा पुन्हा भारत देशात जन्माला याव्या म्हणून प्रार्थना करेन.

माझा भारत देश सुजलाम सुफलाम बनवावा आणि संपूर्ण जगाचे नेतृत्व भारताने करावे. सुविद्य सुसंस्कृत सर्व धर्मांचा सन्मान करणारी माझी संस्कृती पूर्ण जगात नांदावी. एवढेच माझे छोटेसे पसायदान परमेश्वराकडे असेल.


Rate this content
Log in