SWATI WAKTE

Others

4  

SWATI WAKTE

Others

दानशूर कर्ण

दानशूर कर्ण

2 mins
2.1K


दुर्वास ऋषींची सेवा कुंतीने करते . त्यामुळे प्रसन्न होऊन दुर्वास ऋषीं कुंतीला पुत्रप्राप्तीसाठी मंत्र देतात . त्याची उत्सुकता म्हणून कुंती सूर्याला स्मरून मंत्राचा प्रयोग करते. व मंत्रोच्चाराच्या प्रयोगाने कुंतीला कुमारी असतानाच पुत्र प्राप्ती होते . तो सूर्यपुत्र खुपच तेजस्वी व त्याला जन्मतः शरीराला अभेद्य कवच कुंडले असतात.ती कवच कुंडल त्याचे रक्षण करण्यासाठी असतात. कुंती अविवाहित असल्यामुळे घाबरून त्या पुत्राला गन्गा नदीत सोडते. तो पुत्र हस्तिनानपुत्राच्या सारथी अधिरथाला दिसतो व ते तेजस्वी कवच कुंडले असलेले बालक तो घरी घेऊन जातो. त्याचे नाव वसुसेन ठेवतो. पुढे त्या वसुसेनला कवच कुंडल मुळे कर्ण म्हणून ओळखल्या जाते. 

कर्ण हा अत्यन्त पराक्रमी असतो. तो दानशूरही असतो. तो सर्वात दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. तो सर्वात पराक्रमी असतानाही त्याला सूत पुत्र म्हणून गुरुकुलात परीक्षेला सामोरे ही जाता येत नाही. त्याला असे सांगितले जाते की ह्या परीक्षेचा अधिकार फक्त क्षत्रियालाच आहे. त्या परीक्षेसाठी सर्वोत्तम असतांना देखील परीक्षा देण्यापासूनच कर्णाला वंचीत केल्या जाते. द्रौपदीच्या स्वयंवराला अट ठेवली जाते त्यात माश्याच्या डोळयांत पाण्यात बघून बाण मारायचा असतो. आणि ती क्षमता कर्णात असते पण जसा कर्ण ती अट पूर्ण करण्यासाठी जातो.  तसे द्रौपदी म्हणते सुतपुत्राशी मला लग्न करायचे नाही असे म्हणून द्रौपदी कर्णाचा सभागृहात अपमान करते. अश्या प्रकारे सर्व गोष्टीत लायक असूनही सूर्यपुत्र कर्णाच्या वाट्याला अपमानच येतो. 

पण त्याला साथ मिळते ती दुर्योधनाची. दुर्योधन त्याला त्याची वीरता बघून स्वतः च्या स्वार्थासाठी अंगद देशाचा राजा बनवितो. आणि कर्ण आपल्या मित्राला आयुष्य भर साथ देतो. 

एकदा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की दानधर्म तर मीही करतो मग कर्णालाच दानधर्मी म्हणून का ओळखले जाते, त्यावर श्रीकृष्ण म्हणतात थांब मी तुला सिद्ध करून दाखवतो. श्रीकृष्ण अर्जुन आणि कर्ण दोघांनाही सोन्याचा पहाड देतात आणि सांगतात हे सोने प्रजेला वाटा  कसे वाटायचे ते तुमचे तुम्ही ठरवा तर अर्जुन तिथे उभे राहून प्रत्येकाला समान भाग स्वतः दिवसभर वाटत बसतो. कर्ण प्रजेला बोलवतो आणि सांगतो हा सोन्याचा पहाड आहे. हा तुम्ही आपसात वाटून घ्या आणि तिथून कर्ण निघून जातो. त्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. बघितले अर्जुना एकदा आपण दान दिल्यावर त्याचे काय झाले हे सुद्धा कर्ण बघत नाही. म्हणून तोच दानी आहे. कर्ण इंद्राला स्वतः ची कवच कुंडलेही दान करतो. जी त्याला जन्मतःच स्वरक्षणासाठी असतात. असा हा थोर दानी कर्ण शूरवीर, मैत्रीसाठी जीव देणारा कर्ण महाभारतातील महान पात्र आहे.


Rate this content
Log in