Jyoti gosavi

Others

3.9  

Jyoti gosavi

Others

छत्री

छत्री

3 mins
208


आजचा उपक्रम छत्री


तेज धूपसे ये लढ जाता

 वर्षा के आगे अड

 जाता काम बडा ये मेरे आता

 मेरा छाता मेरा छाता


 आजचा विषय पाहून मला शाळेतली ही कविता आठवली आणि खरंच आहे ऊन पाऊस यापासून संरक्षण करणारे छत्र म्हणजे छत्री. 

छत्रीचा संदर्भ अगदी जुन्या काळात पाहिला तर, दशावतारापैकी वामन अवताराच्या हातामध्ये छत्री आहे. 

त्यानंतर पुराण काळापासून ते अगदी शिवाजी महाराजांपर्यंत ज्याला छत्र आणि चामर आहेत तो राजा छत्रपती. 


शिवाय आपण वाक्यप्रचार ऐकतो, की डोक्यावरचे छत्र हरपले, किंवा अजून डोक्यावर आई-वडिलांचे छत्र आहे. 

डोक्यावर गुरूंचे छत्र आहे, म्हणजे जी व्यक्ती तुमचे सगळ्या बाजूने संरक्षण करते तुम्हाला आशीर्वाद देते त्याचा अर्थ तिथे तुमच्या डोक्यावर छत्र धरलेले आहे.

त्या छत्राचा अपभ्रंश छत्री असा झाला असावा

 

छत्री हे मानाचं प्रतीक आहे. आणि मग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसावर कोणी छत्र तर धरणार नाही, मग या छत्रीची निर्मिती झाली असेल. असे मला वाटते


म्हणतात ना गरज ही शोधाची जननी, 


बर! या छत्रीचे उपयोग तरी किती ?कोणापासून तोंड लपवायच असेल छत्री खाली करा ,

कोणाला पटवायचं असेल तर आपल्या छत्रीत घ्या. 


तीन तीन चार चार मैत्रिणी एका छत्रीमध्ये घुसून घुसून चालणार, फक्त डोकं शाबूत राहिलेलं असतं ,बाकी खांदे आणि सगळं अंग भिजलेल असतं, कधी ती वाऱ्याने "उलटी पालटी" होते , तर कधी ती मोडते. 

हे झालं बालपण


"प्यार हुआ इकरार हुआ

 प्यार से फिर क्यू डरता है दिल


 हे गाणं ऐकलं तरी पावसाळी दृश्य, आणि "तुझ्या डोक्यावर की माझ्या डोक्यावर

 तुझ्या डोक्यावर की माझ्या डोक्यावर

 अशी खिचातान करत  एका छत्रीतले राज कपूर आणि नर्गिस डोळ्यासमोर येतात. 


एक छत्री और हम है दो

 अब कैसा हो

 सजन कुछ तो करो 

भिगणे दो जरा भिगणे दो 

हे गाणं डोळ्यासमोर येतं .

हे झालं तारुण्याचे प्रतीक. 


पावसाळ्यात बाहेर जाऊन आलो, आणि एकच खांदा भिजलेला पाहून, आई म्हणाली" बाळा लवकर घरी घेऊन ये तिला" ह्या चार ओळी बरच काही सांगून जातात.


आणि वाकड्या दांड्याची छत्री टेकीत जाणारे आजोबा, हा झाला म्हातारपणाचा सिम्बॉल म्हणजे आयुष्याच्या तिन्ही स्टेजमध्ये छत्री लागतेच छत्रीची गरज लागते. 


बर! छत्र्या तरी किती प्रकारच्या ,नवनवीन ,


पूर्वी फक्त काळा रंगाची आणि वाकड्या दांड्याची छत्री म्हणजे छत्री, 

तेव्हा पण विविध रंगाचा एक एक पट्टा असणाऱ्या लहान छत्र्या श्रीमंत लोकांच्या मुलांकडे असायच्या. 

त्यानंतर डबल फोल्ड चा जमाना आला .

त्यानंतर ट्रिपल फोल्ड चा जमाना आला, आणि विविध रंगाच्या अगदी इष्टमन कलर छत्र्या बाजारात आल्या. आता तर काय स्पायडरमॅन पोकेमोन विविध प्रकारचे रंग हार्ट फुले अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या छत्र्या बाजारात आल्या


शिवाय वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आपली जाहिरात करण्याचे एक साधन म्हणून देखील छत्र्यांचा वापर होतो. 


मंडळी, मी तर एक छत्रीच्या मुठीमध्ये छोटासा पंखा असलेली छत्री देखील पाहिलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बरोबर ती चेहऱ्याला हवा घालत असे. 

मी दाभोळला सर्विस ला असताना तेथे एक "रंजना" नावाची एएनएम होती तिच्या भावाने कुठून तरी तिला ती छत्री पाठवलेली होती. तिच्या छत्रीत बॅटरीवर चालणारा पंखा होता .

पुन्हा काही तशी छत्री मला बघायला मिळाली नाही.


 फिल्म घायल मध्ये एक सीन आहे, ज्यांनी सिनेमा बघितला त्यांना आठवला असेल .

पावसाळा आहे भरपूर काळ्या छत्र्या उघडून माणसे उभी आहेत. 

पाऊस पडत आहे, 

एक कोणतरी जीव खाऊन पुढे पळत आहे. आणि त्याच्यामागे तलवारी घेऊन चार-पाच माणसे लागलेली आहेत .असा तो सीन उघडलेल्या छत्र्यांमुळे खूप इफेक्टिव वाटला. 


तर हे असे छत्रीपुराण आहे अजून शोधलं तर भरपूर सापडेल असो

 आता मी बास करते. 


खरे तर मला जुनीच आवडते, पण ती जागेवर नसल्यामुळे नवीन आणली. आणि त्यानंतर जुनी देखील सापडली, आता दोन्हीही कशा सांभाळायच्या?


अहो दुसरं काय


Rate this content
Log in