Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Avanee Gokhale-Tekale

Others


3  

Avanee Gokhale-Tekale

Others


छोटी छोटीसी बात

छोटी छोटीसी बात

2 mins 570 2 mins 570

शीर्षक वाचून अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा आठवले ना.. तशीच काहीशी आहे ही गोष्ट.. आमच्या एका मित्राची एक छोटीसी बात..


आजही "तो" ८.०४ ठाणे ट्रेन पकडतो..  पनवेल हार्बर लाईनचे पहिलेच स्टेशन.. त्यामुळे first class ची window seat फिक्स त्याचीच वाट बघत असते.. या सीट साठी तो आजही लवकर पोचून थांबलेला असतो.. तो गजाला डोके लावतो आणि डोळे खिडकीच्या बाहेर काढतो.. नेरुळ यायची वाट बघत उगाच वेळ काढतो..


नेरुळ ला "ती" चढते.. धावत पळत.. ladies first class मध्ये.. डोक्यावर गुंडाळलेले ओले केस, लेगीन कुर्ता, गळ्यात ऑफिस चे I-card आणि एका खांद्याला लॅपटॉप बॅग लटकलेली.. खिडकीच्या बाहेर काढलेले त्याचे डोळे भरून पावतात.. तिला आजही बसायला जागा मिळतच नाही.. ती दारात ओथंबून उभी.. पायात बॅग सावरून ती बॅग मधून पुस्तक काढून वाचायला सुरवात करते.. तिला पुस्तक वाचताना बघून आपण कसे काहीच वेगळे करत नाही याचा त्याला आज परत एकदा साक्षात्कार होतो.. तो आजपण ठरवतो.. उद्यापासून आपण पण पुस्तक वाचायचं.. नकळत ती पुस्तकाच्या मागून त्याला बघते.. रोज बघून सवयीच्या झालेल्या त्याला एक smile देते.. तो घायाळ.. दिवस सार्थकी.. जमेल तेवढा मोठा श्वास घेऊन पोट आत घेत तो return smile देतो.. आपल्याला अबरचबर खाणे कमी करून पोट कमी केले पाहिजे याचाही साक्षात्कार त्याला परत एकदा होतो.. तो आजपण ठरवतो उद्यापासून gym नक्की.. बास!! एवढीच त्यांच्यामधली काय ती देवाण घेवाण..


ती घणसोली स्टेशन आल्यावर थोडे केस ठीक करते.. मोबाइल adjust करत एकदा थोडा चेहराही ठीक करते.. रबाळे स्टेशन आल्यावर ती उतरते.. त्याला आठवत आता पुढचं स्टेशन आपलं.. कासवासारखं अंग आकसून घेत ऐरोली ला तोही खाली उतरतो.. तिच्या एका smile मुळे घायाळ झालेल्या त्याला सगळी romantic songs एकाच वेळी म्हणावीशी वाटत असतात.. उगाच गालात हसत तो ऑफिस मध्ये शिरतो.. ऑफिस मध्ये लॅपटॉप बडवताना सुद्धा दिल गार्डन गार्डन.. मग चहा पिताना घडलेला सगळा प्रकार तो आम्हाला तपशील वार सांगतो..


२ वर्ष हे सगळं असंच चालू आहे.. आम्हाला जरी ती मुलगी रस्त्यात दिसली तरी तिला ओळखू आम्ही; इतके तपशीलवार वर्णन आम्ही २ वर्ष ऐकत आलो आहे.. सगळे त्याला सांगत असतात अरे एकदा उतर तू पण तिच्यासोबत रबाळेला.. बोला की काहीतरी.. पण सांगितलं ना.. तसं केलं असतं त्याने तर आजच्या जमान्यातला अमोल पालेकर का म्हणलं असतं..


एक दिवस तो येतो.. resignation देतो.. तीन महिने संपतात तरी सांगत नाही कुठे चालला ते.. आमच्या डोक्यात त्याच्या सोबत "ती" उगाचच.. उगाचच उदास उदास..शेवटच्या दिवशी निघताना त्याचे डोळे चमकतात.. दिल गार्डन गार्डन.. तो एवढंच म्हणतो आता उद्यापासून प्रवासाचे एक स्टेशन कमी.. आता रबाळेलाच उतरणार..


आजही "तो" ८.०४ ठाणे ट्रेन पकडतो.. पनवेल हार्बर लाईनचे पहिलेच स्टेशन.. त्यामुळे first class ची window seat फिक्स त्याचीच वाट बघत असते.. या सीटसाठी तो आजही लवकर पोचून थांबलेला असतो..


रंग बदल बदल.. मन को मचल मचल..

रहे है चल न जाने क्यू वो अंजान पल.. !!!Rate this content
Log in