छंद देई आनंद
छंद देई आनंद


इयत्ता सहावीच्या वर्गात सरानी विद्यार्थ्यांना माझा छन्द ह्या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनिकेत म्हणाला सर पण छन्द म्हणजे काय असतं? सर म्हणाले छंद म्हणजे जे काम फावल्या वेळात आपल्याला करायला आवडते आणि त्यात आपल्याला खुप आनंद मिळतो जसे कुणाला पुस्तकं वाचण्याचा छंद असतो.. कुणाला चित्र काढण्याचा, कुणाला गाण्याचा छन्द असतो तर कुणाला मोबाईल वर तासन्तास गेम्स खेळण्याचा छन्द असतो, कुणाला कार्टून बघण्याचा पण तुम्हाला सर्वानाच कदाचित कार्टून बघण्याचा किंवा मोबाईल वर गेम्स खेळण्याचा छन्द असेल पण हे दोन छंद सोडून तुम्ही कोणताही विषय लिहू शकता... आता तुम्हाला वाटेल आम्ही तर फक्त दोनच गोष्टी करतो मग काही लिहूच शकत नाही.. पण मुलांनो तुम्हाला जे हे दोन छन्द आहेत ते छन्द नाहीत तर एक प्रकारचे व्यसन आहे ज्याच्या आहारी जाण्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते जसे तुमचे डोळे खराब होऊ शकतात, तुमचे अभ्यासातले लक्ष उडून जाते, तुमचे खाण्यापिण्याचे लक्ष उडते, त्यामुळे तुमची योग्य वाढ होत नाही किंवा एकाच जागी बसून खेळल्यामुळे मैदानी खेळ खेळत नाही त्यामुळे स्थूलता येते .. हो पण तुम्हाला कुठल्याही मैदानी खेळाचा छन्द असेल तर तुम्ही त्याबद्दल जरूर लिहू शकता जसे फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल इत्यादी सारखे.. गुरुजी पुढे म्हणाले आमच्या लहानपणी मोबाईल नसल्यामुळे आमच्या काळातील मुलांना बरेच छन्द होते जसे कुणाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मैदानी खेळायचे , कुणाला पोस्टाचे तिकीट गोळा करण्याचे, कुणाला वेगवेगळ्या प्रकारचे नाणी गोळा करण्याचे, कुणाला वेगवेगळ्या प्रकारचे दगड गोळा करण्याचे..
हे सर्व ऐकून मुलं विचार करू लागली पण कुणालाच काही सुचत नव्हते कारण सर्व मुलं फावल्या वेळात मोबाईल किंवा कार्टून बघत होते.. मग सर्वांनी सरांना त्यांच्या छन्द बद्दल विचार करायला वेळ मागितला एक आठवडा त्यांनी वेळ घेतला एक दोन दिवस त्यांना काहीच सुचले नाही.. मग दोन दिवसांनी हळू हळू कुठल्या तरी कामात रमू लागले. आणि त्यात त्यांना आनंद मिळू लागला आणि मोबाईल आणि कार्टून कमी व्हायला लागले..
एक आठवड्यानंतर सर्वांनीच छान लिहले व सर्व मुले खुप खुश झाले.. आणि छन्द जोपसल्यानी काय आनंद मिळतो हे त्यांना कळले....