चौदावा दिवस 07 / 04 / 2020
चौदावा दिवस 07 / 04 / 2020


आज सकाळी कपाट उघडताच साने गुरुजी यांचं श्यामची आई हे पुस्तकं हातात पडलं आणि मन भूतकाळात रंगून गेलं. आम्हांला मराठी शिकवायला भिडे मॅडम होत्या पाचवीला त्यांनी या पुस्तकातली एक गोष्ट वर्गात सांगितली होती आणि शक्य असेल तर हे पुस्तकं वाचा असं सांगितलं होतं. घरी आल्यावर मी हट्ट करून हे पुस्तकं विकत घेतलं होतं आणि तेव्हापासून आजपर्यँत कितीतरी वेळा ते पुस्तकं वाचून काढलं. Lockdown मुळे आज असं संस्कारक्षम करणारे पुस्तकं वाचण्याची संधी मी थोडीचं सोडेल? पुन्हा घेतलं ते पुस्तकं वाचायला.