चांडाळ चौकडी
चांडाळ चौकडी


संपूर्ण जगावर कोरोना या महाभयंकर बिमारीने सध्या आपलं वास्तव्य पसरविले आहे. या काळजीपोटीच आपल्या देशाने सरकारने घेतलेला एक उत्तम असा आदेश.... बाहेर निघून संसर्ग पसरविण्यापेक्षा घरात बसून काम करा. त्यामुळे आता बाबा पण घरीच...पण सुट्ट्या नव्हे हो.... घरी बसून त्यांना ऑफिस चं काम करायचंय. मुलांना सुद्धा शाळेच्या सुट्ट्या यावर्षी कोरोना मुळे लवकरच लागल्यात...परीक्षा पण नाही. मग आता दिवसभर पिंकी आणि पिंट्या करणार काय? बाबा आपल्या कामात, आई घरकामात व्यस्त...दोघांना वेध लागले ते मामाच्या गावाला जायचे. मग काय???मामाला फोन केला....घ्यायला ये लवकर, आम्हाला गावाला यायचंय...मामाची दोन मुलं चिंक्या, चिंटी पण मस्त खुश, पिंकी, पिंट्या येणार म्हणून. मस्त जमायचं चौघांचं .....समवयस्कच होते चौघेही. मामा खेड्यावर राहणारा, शेतीच काम त्याच...ऑफिस-बिफिसच काही लोड नाही. आणि खेड्याच वातावरण म्हणजे एकदम शुद्ध...देवाच्या कृपेन तिथपर्यंत तरी कोरोना अजून तरी पोहोचला नव्हता. तर मग काय...? पिंटू, पिंकीची स्वारी एकदाची पोहोचली मामाच्या गावाला.
मस्त शेतावर जाणं, विहिरीच्या मोटर पंपावर मस्त आंघोळ करणं.... मस्त "चांडाळ चौकडीच " जमली चौघांची. आणि त्यात लाड पुरवणारी मामी, आणि गोष्टी सांगणारे आजी आजोबा...मग काय मस्त धमाल... खाओ-पीओ और मौज करो....,नुकताच उन्हाळा लागला होता, होळी आटोपली होती. गावात आताही होळी झाली की रात्री अंगणात मस्त खाटा टाकायच्या आणि चांदण्या मोजत , आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकत झोपायचं...मस्त निसर्गरम्य वातावरण.... अहाहा!!!! काय वर्णावी ती मजा...दिवसा कॅरम, पत्ते, सागरगोट्या, लगोरी मस्त वेळ निघून जायचा.आणि रात्री झोपतांना आजी ची गोष्ट...
त्या दिवशी आजी ने अशीच एक गोष्ट सांगायला सुरुवात केली..."चोर आणि शिपायाची" गोष्ट ऐकत ऐकताच पिंट्याला झोप लागली.... रात्रीचे एक-दीड वाजले असतील....पिंट्या जोरजोरात ओरडायला लागला .....चोर.... चोर....धावा.... धावा.....आजूबाजूचे सर्व उठले, कुणी हातात काठ्या घेतल्या, कुणी चपला, कुणी दगड....,जे हातात येईल ते... सर्व पिंट्या च्या भोवती गोळा झाले....कुठंय चोर... तोपर्यंत पिंट्या स्वप्नातून जागा झाला होता. आजूबाजूची गर्दी पाहून त्याला कळून चुकलं "अरेच्या आपण तर स्वप्न पाहत होतो, ओरडलो आणि सर्व जमा झाले....काय करावं बरं आता??? आपण जर खरं सांगितले तर सगळे हसतील आपल्याला ... त्याला युक्ती सुचल... शहरातलं पोरं ते..निरागसपना चा भाव आनून तो रडायला लागला. आजी--उगी उगी बाळा.... रडू नको...तेच तर हवं होतं पिंट्याला... पिंट्या रडत रडत म्हणाला, " आजोबा, मला न तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला उठलो, आणि बाथरूम ला जावं म्हणून ना मी गेलो...तर तिथं ना आजी,.... एक काळा कपडा तोंडाला बांधलेला माणूस दिसला ....मी सरळ धावत आलो ....खाटेवर पडलो...आणि ओरडलो चोर...चोर...तो न....तिकडे गेला...त्या वाटेकडे बोट दाखवून म्हणाला... आजीने त्याला पटकन आपल्या कवेत घेतलं ,"घाबरल ते माझं पिल्लू... बर बेटा, झोप आता....ही सगळी शोधतील त्याला... पण पिंटूची ही करामत पिंकी, चिंटू, चिंकी च्या लक्षात आली बर का....ती मात्र तोंडावर हॅट ठेवुन गालातल्या गालात हसत होती.. अशी ही चांडाळ चौकडी मस्त ढारढुर झोपली....आणि गावातले लोक रात्रभर गावात गस्त घालत होते "जागते रहो-जागते रहो".... घराघरात जाऊन गाईच्या गोठयात, तनसाच्या खाली, खाटेच्या खाली.... सर्व ठिकाणी शोधलं ...पण चोर काही मिळाला नाही. (कसा सापडणार.... चोर आलाच नव्हता हो...) गावकऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करून ही चौकडी दुसऱ्या दिवशी मस्त गाणं गुणगुणत होती. "कैसे उल्लू बनाया, मस्त मजा आया"(त्यांचं गाणं ऐकून आजी-आजोबा सुद्धा गालात हसत होते...समजले ते त्यांची करामत)
वरील लिखाण copyright कायद्यांतर्गत असून साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे. आवडल्यास शेअर करा मात्र नावासह ही नम्र विनंती🙏