बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है
बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है
आरती आणि अर्णव यांचा बघण्याचा कार्यक्रम झाला .दोन्ही स्थळे एकमेकाला पूरक होती .आरती मराठी मध्ये एम ए करून एका कॉलेजमध्ये लेक्चर होती ,तर अर्णव इंजिनिअर होता .पण तो मर्चंट नेव्ही मध्ये असल्यामुळे वर्षाचे आठ महिने तो बाहेर असणार होता. कोणत्याही स्थळाला माहिती देताना आरती स्वतःचा उल्लेख आवर्जून कवयित्री आणि लेखिका असा करत असे अर्थात त्या तिच्या कॉलिफिकेशन चा व्यवहारी जगात काही उपयोग नसल्यामुळे दोन्हीकडची मंडळी त्याला गणतीत धरत नसत. आणि इथेच खरी मेख होती.
नवरा पण असा हवा होता ज्याला कवितेमध्ये गम्म्य असावे. किमान गेला बाजार, मंगेश पाडगावकर बा. भ.बोरकर वि वा शिरवाडकर, ग दि माडगूळकर या प्रभृतींची नावे ठाऊक असावीत आणि इथेच तर घोड पेंड खात होतं एकतर आजकालची आँग्लाळलेली पिढी, त्यातून शालेय शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये, संभाषणपण इंग्लिशमध्ये, शासनाने मराठी हा विषय शाळेत कंपल्सरी केल्यामुळे यांना फक्त प्रायमरी मराठी. त्यातील धड चार वाक्यपण यांना बोलता येत नाहीत, का लिहिता येत नाहीत.
दोघेही एकमेकांना एकदम अनुरूप होते तोही काळासावळा उंचापुरा धिप्पाड व्यक्तिमत्त्वाचा तर ती गोरीपान नाकेली शे लाट्या बांध्याची दोघे एकमेकांना पसंत होते आणि घरच्यांना देखील पसंत होते .पण आता जेव्हा ती त्याचा एकट्याचा इंटरव्यू घेईल तेव्हा, त्याला साहित्याबाबत प्रश्न विचारेल, तेव्हा त्याची फे फे उडणार होती. म्हणजे तसा तिचा शिरस्ताच होता. त्यामुळेच आजपर्यंत अनेक स्थळांना तिने नकार दिला होता.
आता अर्णवलादेखील हीच बायको पाहिजे होती, मनातल्या मनात त्याने प्रतिज्ञा केली" केलं तर लग्न तुझ्याशीच" मी तुला पटवून दाखवीन त्याने तिच्या आई-वडिलांना बाजूला घेतले व मला तुमची मुलगी पसंत आहे तुमच्या मुलीशीच मला लग्न करायचे आहे असे तो सांगत होता. तेवढ्यात आरतीने आवाज दिला काय आई बाबा कोपऱ्यात काय खुसूर फुसूर करताय? मला पण कळू द्या! काही नाही गं मग मूर्त कधीचा धरायचा असं तो विचारतोय. नाही हं आई असं चालणार नाही ! मी इंटरव्यू घेतल्याशिवाय मुहूर्त बिर्थ काही नाही. हो ग बाई, हो आम्हाला तुझ्या अटी माहित आहेत.
आरतीच्या पाठीमागे आरतीचे आईवडील अर्णवचे आई वडील आणि तो स्वतः यांची एक बैठक झाली. सर्वांनी त्याला वेगवेगळे सल्ले दिले, पण शेवटी खरी लढाई त्यालाच लढायची होती. त्याला काय करावं ते सुचेना एवढ्यात त्याला आपल्या कॉलेजमधील एका कवी मित्राची आठवण झाली त्याने ताबडतोब फोन केला व आपली अडचण त्याला सांगितली अरे कवी माझ्यासाठी काहीतरी कर बाबा! कवी पण आढेवेडे घेऊ लागला बघ मी तुला काही ट्रिक सांगितल्या तर मला पार्टी आणि तुमच्या लग्नात मला सूट शिवायचा. शिवाय मंगलाष्टका मी बनवून आणणार लग्नात माझ्या आवाजात गाणार मंजूर? नको रे बाबा काही पण कर पण तू मंगलाष्टका गाऊ नको . मी तुला विनंती करतो अरे कुठल्या जन्माचा सूड काढतोस? मग त्या कवी मित्राने फोनवर खालील प्रमाणे टिप दिल्या ,पहिले तू दोन-तीन लायब्ररीचे मेंबरशिप घे त्यांच्याकडून पुस्तके घेऊन ये रात्रीचा जागून वि वा शिरवाडकर' मंगेश पाडगावकर 'ग दि माडगूळकर ,ना धो महानोर ,इंदिरा संत इत्यादी बद्दल अभ्यास कर.
तिच्या प्रश्नाला जास्त उत्तरे देऊ नको नुसती मान हलवली हो, हो, म्हण आणि हसून वेळ मारुन ने मात्र भेटीला जाताना आठवणीने हातात सतत एखादे पुस्तक असावे आणि त्या पुस्तकाबाबत तुला आणि माहिती असावी. त्याने पहिली मराठी ग्रंथसंग्रहालयात नाव नोंदणी केली तेथील मदत गाराला सांगून होणाऱ्या वाग्दत्त वधू साठी पुस्तके पाहिजेत असे सांगून काही पुस्तके निवडली पहिल्याच दिवशी हाता मध्ये कुसुमाग्रजांचा विशाखा घेऊन गेला सोबत व पु काळे यांच्या चारोळ्या होत्याच.
अय्या! तुला कुसुमाग्रज आवडतात मग आपलं जमेल जमेल नक्की जमेल ती बोलली आणि तिने पृथ्वीच्या प्रेम गीताबद्दल बोलायला सुरुवात केली काय कल्पना सुचली अ
सेल नाही? आपली पृथ्वी वर्षानुवर्ष सूर्याभोवती फिरते ती सूर्याच्या प्रेमापोटी माहित आहे दोघांनाही की आपलं मिलन होणार नाही पण म्हणून काही तिथं प्रेम कमी झाले नाही ती आपला मुद्दा मांडत होती आणि तो फक्त तिच्या चेहऱ्यावरचे विभ्रम बघत होता
एकदा भेटायला गेल्यावर त्याने सुरुवात केली
"मनातल्या मनात मी मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो"
आणि तिचा चेहरा एकदम खुशीने फुलला अरे वा सुरेश भट तू त्यांचा पण फॅन आहेस वाटतं काय एक गाणी आणि गजला लिहिल्या रे त्यांनी... उषःकाल होता होता त्यांचंच, मलमली तारुण्य माझे त्यांचंच काय एखाद्या माणसाकडे कल्पनाशक्ती असावी नाही का हॉटेलमध्ये तावातावाने आपला मुद्दे मांडत होती आणि तो हातावर हनुवटी टेकून तिच्याकडे पाहत होता
आता भा रा तांबेच घ्या ना! काही काळ ती काय म्हणते त्याला कळलेच नाही अरे आत्ता तर मी तिच्या आवडीचा नाश्ता मागवला आता काय घ्या ह्या हॉटेलात काय कवी-लेखक नावाची डिश आहेत की काय तिच्या सहवासात राहून त्याची पण कल्पनाशक्ती आज-काल भराऱ्या घेत होती.
अरे बघ! तिने आपला मुद्दा पुढे चालू ठेवला ज्या भा रा तांबे यांनी नववधू प्रिया मी बावरते लिहिलं त्याच भा रा तांबेनी मधु मागसी माझ्या सख्या परी मधुघट ची रिकामे पडती घरी असं लिहिलं एक माणूस रोमँटिक लिहू शकतो तोच माणूस एवढा विरोधी पण लिहू शकतो तो दरवेळी श्रोत्याची भूमिका करायचा ती काय म्हणते त्याला मुंडी हलवायचा हो ला हो म्हणायचा हसून वेळ मारून न्यायचा मग कधी पुलंची नाटके ,गदिमांच्या कादंबऱ्या ,ना सी फडके, बाबा कदम, शिवाजी सावंत, चंद्रकांत काकोडकर, पु भा भावे या सर्वांच्या साहित्याबद्दल ती बोलत राहायची तो आपला दरवेळी जे पुस्तक बरोबर न्यायचा त्याचा अभ्यास करून जायचा म्हणजे त्याच्या कवी मित्राने त्याला चांगला घोटूनच घेतलं होतं. चालू घडामोडीतही तिला काही वर्ज नव्हतं ती विश्वास पाटलांनी बद्दल बोलायची आणि संदीप खरे बद्दल पण बोलायची शेवटी अशा चार-पाच गाठीभेटी झाल्या आणि आणि तिने ग्रीन सिग्नल दिला म्हणजे पुढच्या घडामोडींसाठी अनुकूलता असा लग्नही ठरलं तारीख ठरली ठरलेल्या तारखेला तिचं शुभमंगल आटपलं गिफ्ट मध्ये काय आलं तर पुस्तकच पुस्तक तिच्या मैत्रिणी याचे मित्र सर्वांनी पुस्तके भेट दिली स्वस्त आणि मस्त भेट बघून त्याचा चेहरा पडला पण तिचा चेहरा खुलला हनिमून ला जाताना जाताना काय काय कपडे घ्यायचे? यापेक्षा कोणती कोणती पुस्तके घ्यायची ?यावरच ती बोलत होती खरेतर आता काय करायचं, त्याचं पण डोकं बधीर झालं पुस्तकाची एक बॅग तिने स्वतःच्या हाताने भरली बाकी कपडेलत्ते घेण्याची चॉइस नवऱ्यावर सोपवली तुला हवं ते बॅगेत भर मी तुझ्या आवडीचे कपडे घालीन .मग त्याने स्वतःच्या प्रमाणे सगळे पॅन्ट आणि टॉप भरले प्रवासाला निघताना तिची बॅग तो सोयीस्करपणे विसरला एका थंड हवेच्या ठिकाणी ते हनिमून ला गेले दिवसभर भटकून खाऊन पिऊन संध्याकाळी रूमवर आले आणि कपडे बदलताना तिला आपल्या पुस्तकांची आठवण झाली अर्णव आपली पुस्तकांची बॅग दिसत नाही. अर्रररर विसरली वाटतं घरीच! तो सहज बोलणार हे रे काय? मला रात्री झोपताना पुस्तक वाचण्याची सवय आहे त्याशिवाय मला झोप लागणार नाही आता मी काय करू ती एकदम अस्वस्थ झाली
त्याने हळूच जाऊन पाठीमागून तिला मिठीत घेतले व आपल्याकडे तिचे तोंड वळवले आणि म्हटला राणी! अगं ती पुस्तकं काय? आयुष्यभरच वाचायची त पण माझ्या डोळ्यात जे पुस्तक आहे ना ते जरा वाच ना !तो एकटक तिच्याकडे पाहू लागला त्याबरोबर तिने लाजू नजर खाली वळवली आणि पुटपुटली मला माहित आहे तू मुद्दामच माझी पुस्तकं घरी ठेवून आलास. मी तुला सोडणार नाही त्यावर मिश्किलपणे तो म्हणाला अगं नकोच सोडूस चांगलं घट्ट धर! आणि तो चक्क गाऊ लागला
किताबे बहुत सी पडी होगी तुमने
चेहरा किसी का कभी तो पडा है
बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है
ती लाजून त्याच्याच कुशीत शिरली