Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

ब्लाउज पीस एक देणे

ब्लाउज पीस एक देणे

2 mins
393


ब्लाउज पीस एक देणे पूर्वी अशी पद्धत असायची, तुमच्या घरांमध्ये कोणतीही सवाष्ण बाई पहिल्यांदा घरी आली, तर तिची ओटी भरून पाठवायची.

आता ओटी मध्ये काय असते ?तर तांदूळ, नारळ किंवा खोबऱ्याचा तुकडा आणि एक ब्लाउज पीस. गेला बाजार तुम्ही बाकी काही पाहुणचार जरी केला नाही तरी कपभर चहा हळदी कुंकू आणि ओटी भरली की जाणारी सवाष्ण खुश आणि देणारी यजमान बाई पण खुश .त्यावेळी मॅचींगचा जमाना नव्हता. साडी मध्येच तंतोतंत मॅचिंग ब्लाऊज पीस येत नव्हते. शिवाय "एक नूर आदमी दस नूर कपडा" अशी पद्धत नव्हती. त्यामुळे साधारणत त्या बाईला तुला कोणत्या रंगाचा ब्लाऊज पिस हवा असं देखील विचारलं जायचं. साधारण ती स्वतःच्या साडी वरती मॅचिंग रंगाचा ब्लाउज पीस उचलायची. शिवाय एका लोकगीतांमध्ये मी ऐकलेले आहे आई मुलीला विचारते सासरी कशी आहेस? त्यात सासरच्या सगळ्या गोष्टींच्या उणिवा सांगता सांगता

"आई माझ्या झंपरचे

लय ग हाल !

असली कसली

घराची चाल

बाई ग असली

कसली घराची चाल "

असं आई म्हणते ,त्यावरून मुलीला रक्षाबंधन भाऊबीजेच्या निमित्ताने वर्षभराच्या साड्या आणि झंपर माहेरा कडून मिळत असत.

आता काळ बदलला आहे. या मॅचिंग च्या जमान्यामध्ये साडी बरोबरच ब्लाउजपीस देखील मिळतो. शिवाय साडीच्या किमतीचे डिझायनर ब्लाऊज देखील आता घेतले जातात. चंदेरी, सोनेरी बॅकलेस ब्लाऊज, माधुरी दीक्षित स्टाईल चे ब्लाउज, सर्व इस्टमन कलरचे ब्लाऊज ,जे सगळ्या साड्या वरती मॅच होतात. तरीपण आपली जुनी परंपरा म्हणून आपण ओटी बरोबर ब्लाउज पीस हा देतोच. आता या अशा ब्लाउजपिसच करायचं तरी काय? असून अडचण आणि नसून खोळांबा त्यापेक्षा आपण असं केलं तर! घरी येणाऱ्या बाईला एक तर पाकिटात घालून पैसे द्या. त्याचा ती स्वतःच्या गरजेनुसार विनियोग करेल किंवा छोट्या छोट्या पर्सेस, टिकल्यांची पाकिटे, केसाच्या पिना, लिपस्टिक सेट ,पावडरचा डबा, सेंट यातले काही देऊ शकतो जे उपयोगात आणता येईल. ब्लाउज पीस आपले उगाचच घरांमध्ये पडून राहतात आणि मग कधीतरी कोणाला परत ओटी भरून रिर्टन दिले जातात .किंवा नवरात्रात देव्यांच्या ओटी भरण्यात वापरले जातात.

आता जिला वेळ आहे, आणि हातामध्ये कला आहे. अशी स्त्री त्या ब्लाउज पीस च्या बऱ्याच गोष्टी बनवू शकते. जसे की छोट्या छोट्या पर्स शिवणे ,त्याला वरून गोल्डन बॉर्डर, टिकल्या ,मोती इत्यादी लावणे .लहान मुलांची दुपटी शिवणे. बाजारात भाजी आणण्यासाठी मोठ्या मोठ्या पिशव्या शिवणे, इत्यादी गोष्टी करता येतील. पण! आजच्या धावत्या जगामध्ये एवढा वेळ आहे कोणाला? त्यापेक्षा मला तर वाटतं ब्लाउज पीस देणे ही प्रथाच बंद करावी.



Rate this content
Log in