भय.....
भय.....


भय म्हणजेच भीती. भीती ही मानवजातीला मिळालेला शाप म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अगदी लहान बाळ पण आवाजाने दचकते म्हणजेच त्याला भीतीद वाटते. प्रत्येकाला आपल्या जीवाची पर्वा आहे.काळजी आहे.अचानक समोर दिसले की झाले! लागले काळीज ढडधडायला. समोरून सर्रकन साप गेला लागली भीती वाटायला. अगदी आपण एकाग्रचित्ताने काम करत असू आणि अचानक मागून कोणी आवाज दिला किंवा 'भ्याँ 'केले तरी आपण भीतो.
हेच भय आपल्याला हलक्या काळजाचे बनवते.
कोणाला मरणाची भीती,कोणाला आपल्याला कोणी पाहील याची भीती...
पण भय कशाचे वाटावे....
भय खोटे बोलण्याचे वाटावे.भय कोणाला फसवल्याचे वाटावे. भय चारित्र्यहिनाचे वाटावे. भय चोरीचे वाटावे. भय निरक्षरतेचे वाटावे.भय कूकर्माचे वाटावे.भय अनितीचे वाटावे. भय बेशिस्तीचे वाटावे.
भय ना वाटावे माणूसकीचे
भय ना वाटावे खरेपणाचे
भय ना वाटावे निडर छातीचे
भय ना वाटावे मांगल्याचे.....