Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

पुस्तकं

पुस्तकं

1 min
7


 पुस्तके आपल्याला जीवनभर साथ देतात. आपल्याला फक्त वाचनाची आवड हवी. वाचन छंद जोपासता यायला हवा.

  या वाचनामुळे आपल्याला लेखन कौशल्य प्राप्त होते. लेखन शैली प्रभावी होते. लेखन समृद्ध होते.

  पुस्तक वाचनामुळे आपल्याला नवपंख मिळतात. त्या पंखांच्या बळावर आपण यशस्वी नवीन भरारी घेऊ शकतो.

  पुस्तके आपल्याला प्रेरणा देतात. आपण लिहिलेले पुस्तके आपल्याला प्रसिद्धी देतात. आपले लेखन सर्वांपर्यंत पोहोचते. आपले लेखन कोणाला आवडले तर निश्चितच आपल्याला अभिप्राय सुंदर मिळतात.

  पुस्तकांमुळेच आपल्याला पारंपरिक माहिती मिळते. त्यातून आपल्या विचारांना चालना मिळते. विवेकशीलता प्राप्त होते.

 भूतकाळातल्या चुका पुन्हा होत नाहीत. वर्तमान काळ सुधारतो. भविष्यकाळात कसे वागायचे हे समजते.

  आपण वाचनाचा वापर सकारात्मक दृष्टीने करावा. पुस्तकातील नकारात्मक विचार घेऊ नये.

  हल्ली ऑडिओ स्वरूपात सुद्धा पुस्तक ऐकायला मिळतात. रोज अर्धा तास जरी याचे शब्द कानावर गेले तरी खूप छान मनावर खोलवर परिणाम होतात.

  रामायण,महाभारत यासारखे ई- बूक हल्ली प्रसिद्ध आहेत. विविध कादंबऱ्या असतात. कथासंग्रह असतात. कवितासंग्रह असतात. थोडा मोठ्यांचे विचार असतात, सुविचार असतात. हे वाचावेत. त्यातील चांगले घ्यावे. आपल्या आचरणात आणावे. चारित्र्य घडवावे. आपण तसे वागून इतरांना सांगावे.

  वाचनाने चांगला माणूस घडतो. वाचन करतात तेच इतिहास घडवतात.असे म्हणतात.

  पुस्तके वाचा आनंदी राहा 

  स्वतःचे चारित्र्य घडवून 

  वाचन व लेखन कृतीत आणावे


Rate this content
Log in