Jyoti gosavi

Others

5.0  

Jyoti gosavi

Others

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही

2 mins
622


भय इथले संपत नाही

मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो

तू मला शिकविली गीते

किंवा

ढळला रे ढळला दिन सखया 

संध्याछाया भिवविती हृदया

या गाण्याच्या ओळी आपण ऐकलेल्या असतील प्रत्येकाला कधी ना कधी भीती या प्रकाराला सामोरे जावे लागते

अगदी लहानपणापासून आपल्या मनामध्ये कधी अंधाराची कधी बागुलबुवा ची भीती उत्पन्न केली जाते

भीती ही अनेक प्रकारची असते त्याला इंग्लिश मध्ये Anxiety किंवा Fobia असे म्हणतात

कोणाला अंधाराची, कोणाला उंचीची , कोणाला पाण्याची, ,कोणाला गर्दीची , कोणाला किडे ,उंदिर, रक्त ,पाल या गोष्टींची भीती वाटते कोणाला रेल्वे किंवा विमान प्रवासाची भीती वाटते आणि सर्वात सार्वजनिक अशी सर्वांनाच मरणाची भीती वाटते

मन चिंती ते वैरी न चिंती अशी एक म्हण आहे त्यामध्ये आपण स्वतःसाठीच किंवा आपल्या आप्तासाठी आपल्या मनात इतके वाईट वाईट विचार येतात किंवा एक प्रकारची एवढी भीती असते की आपला वैरी सुद्धा आपल्याबाबत एवढे वाईट चिंतन आर नाही उदाहरणार्थ एकुलते एक मूल असेल तर त्याला काही होणार नाही ना त्याला कोणी पळवणार नाही ना अशी भीती किंवा स्वतः संबंधी ,पति संबंधी ,आई वडीलां संबंधी मोठ्या मोठ्या आजारपणाची भीती, अशा गोष्टी असतात नोकरीतून काढून टाकण्याची भीती, वगैरे वगैरे भीतीमुळे व्यक्ती अति उत्तेजित अधीर आणि शीघ्रकोपी होते ताण तणाव आणि भीती या दोन्ही हातात हात घालून येतात

दुसरी एक म्हण आहे

कर नाही त्याला डर कशाला

 ही म्हण वाईट वर्तणूक, वाईट कृत्य ,यासंबंधात आहे की बुवा मी काही केलेच नाही तर मी कशाला घाबरू

लोभशोकभयक्रोधमान वेगात विधारयेत/

नैर्लज्येष्य्रतीरागाणाभिश्ध्याश्च या संस्कृत सुभाशिता प्रमाणे चरक असे म्हणतात लोभ भय काम क्रोध अहंकार निर्लज्ज ता दुसऱ्याच्या धनाजी अभिलाषा परस्त्री ची अभिलाषा हे सारे मनाचे वेग आहेत व बुद्धिमान माणसाने ते अडवून ठेवून किंवा आवरून आपले कार्य साधावे

आता नवीन मानसोपचार तज्ञ देखील हेच सांगतात,

याची चिन्हे लक्षणे हातापायांना कंप सुटणे शरीराला थरथर सुटणे घाम येणे तोंडाला कोरड पडणे पोटात खड्डा पडणे कानशिले गरम होणे इत्यादी आहेत. आपण सर्वजण कधी ना कधी याला सामोरे गेलेलो असतो या गोष्टीत थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाला होतात आणि त्या तेवढ्यापुरताच असतात पण जर याचा अतिरेक झाला किंवा कायमच भीती वाटत राहिली त्यामुळे जेवण खाण सुचत नाही, झोप येत नाही कोणात मिसळत नाही एकटा एकटा राहतो उदाहरणार्थ अंघोळीला गेलो तर मी बुडून मरेन अन्न घेतले तर त्यात कोणीतरी विषप्रयोग करेल कोणीतरी मला मारेल अशा प्रकारची भीती जर सतत वाढत राहिली तर मात्र मानसोपचाराची गरज असते

बीपी वाढणे अन्नपचन न होणे या गोष्टी होतात त्याचे डॉक्टरांची गरज असते ,कौन्सिलर ची गरज असते

अन्यथा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला शांतपणे समजावणे समोरच्याला समजावून घेणे त्याचे बोलणे शांतपणे ऐकणे त्याचा शांतपणे विचार करणे स्वतःच्या मनाला खंबीर बनवणे हे महत्त्वाचे शिवाय योगशास्त्रा प्रमाणे श्वासाचे प्रकार योगासने मनाला स्थैर्य देतात व या गोष्टींपासून मुक्ती देतात.

नाहीतर मग गब्बरसिंग सांगतोच ना

"जो डर गया वो मर गया"



Rate this content
Log in