भेदभाव करू नका
भेदभाव करू नका
भारतात देवी पूजल्या जातात. 'मातृदेवो भव' हा मंत्र म्हटला जातो. मात्र भ्रूणहत्येत मुली मारल्या जातात. खरंतर मुलगी होऊ देणे हे वाईट का? मुलगी असो की मुलगा ते महत्वाचं नसतं. महत्वाचे असतात ते संस्कार. आई, वडील आपल्या मुलींना काय संस्कार देतात हे महत्वाचं असतं.
आजच्या काळात लोक इतके शिकले असूनसुद्धा मुली, मुलगा भेदभाव करतात.
आपण बघतो, आजच्या जगात खरंतर मुलींनी किती प्रगती केली आहे तरीही लोकांना मुलगा हवा असतो. लोक मुलींना आपल्या दबावाखाली ठेवतात. मी हे म्हणत नाही की मुलांचे कौतुक करणे वाईट असते पण मुली आणि मुलांमध्ये भेदभाव तरी करू नका, दोघांनाही समान प्रेम द्या.
