भावना सुखदुःखाच्या
भावना सुखदुःखाच्या
*भावना सुखदुःखाच्या* मनातल्या भावना कधीच दाबून ठेवू नयेत. मग त्या सुखाच्या असोत अथवा दुःखाच्या असोत. सुख झाल्यानंतर आपण आनंदाच्या भरात सर्वांना पार्टी देऊन आपले मन मोकळे करतो. आणि दुःख झाले असल्यास आपण मनातल्या मनात कोंडून ठेवतो. अथवा आपल्या जिगरी मित्राला सांगतो. पण बरेच जण असे असतात की आपल्या दुःखाच्या भावना ज्या आहेत त्या मनामध्ये लपवून ठेवतात. त्यामुळे काय होतं आपल्याला आजार व्हायला सुरुवात होते. दुःखी भावना ज्या आहेत त्या आपल्या डोक्यामध्ये खेळ करतात, नृत्य करतात. त्यामुळे मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. डायबिटीस,बीपी असे आजार डोके वर काढतात. माझी एक सवय आहे सुख वाटते जनातून दुःख लिहिते डायरीत मनातून... म्हणजे हे लिहिले की आपले मन रिकामे होते. आपल्याला कितीही जरी दुःख असेल तरी मित्र मैत्रिणी शिवाय आपण ते सांगत नाही. आपल्या आई-बाबांना आपण हे सांगू शकत नाही. कारण त्यांना त्रास होईल हा विचार मनात येतो. मग अशावेळी कोणाला त्रास द्यायचा नसेल तर आपण आपले सहन करायचे असेल तर हा एक उत्तम मार्ग आहे. यात आपले मन रिकामे होतेच परंतु आपल्या अश्रूंनाही वाट मिळते. घरात कोणी नसलं की हे करायचं ही माझी सवय. रात्री मध्यरात्री उठून मनातले विचार लिहून काढायचे ही माझी सवय. याने मनातल्या विचारांचे जे काहूर आहेत ते शांत व्हायला 100% मदत होते हा माझा अनुभव आहे. म्हणून मित्रहो भावना सुखाच्या असले तर त्या जनात वाटा आणि दुःखाच्या असतील तर त्या मनात न ठेवता कागदावर उमटावावे असे मला तरी वाटते. आणि तुमचा चांगला जवळचा मित्र, मैत्रीण असेल तर त्याला निश्चित हे मनातले विचार शेअर करावेत,दुःख शेअर करावेत त्याने आपल्याला शारीरिक व्याधी लागणार नाहीत हे शंभर टक्के खरे आहे. वसुधा वैभव नाईक, पुणे मी. नं. 9823582116
