नासा येवतीकर

Others

1.0  

नासा येवतीकर

Others

भाषेचा प्रश्न

भाषेचा प्रश्न

2 mins
826


मोहन काही दवाखान्याच्या निमित्ताने शेजारच्या तेलंगणा राज्यात गेला होता. त्याच्या जवळच्या मित्रांचे वडील येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यांना पैश्याची गरज होती म्हणून तो बसने प्रवास करत तेथे पोहोचला. पण तेथे त्याला अनेक संकटाचा सामना करावा लागला. मुळात तो सातवी नापास होता, त्याला मराठी सोडून कोणतीच भाषा बोलता येत नव्हते आणि समजत देखील नव्हते. त्या भागात सर्वजण तेलगू किंवा इंग्रजी भाषा बोलत होते जे की त्याला अजिबात समजत नव्हते. मोहन मराठीत बोलायचा जे की त्यांना समजत नव्हते. कोणती बस कोणत्या गावाला जाते ? हे त्या लोकांना कसं विचारावं ? हेच त्याला मुळी समजत नव्हते. काय करावं हे त्याला कळेना. त्याने फक्त गावाचेनाव उच्चाराव आणि बसचा पत्ता मिळवावे हेच दोन तीन वेळा करून कसा बसा तो शहरात पोहोचला. पण शहरातून त्या मोठ्या दवाखान्यात कसंपोहोचावे हा ही मोठा प्रश्नच होता. गावात सिटी बस चालू होते पण कोणती बस कुठे जाते हे त्याला कसे कळणार ? कारण सर्व पाट्या तेलगू भाषेत लिहिलेले होते. त्याच्या डोक्याचा नुसता फालुदा झाला होता. पोटात कावळे ओरडू लागले म्हणून एका हॉटेलात गेला. मोहनला खिचडी भजे किंवा पोहे खायची ईच्छा झाली, तसे त्याने त्याला सांगितले पण त्याने ही हाताचा इशारा करून ते काही मिळत नाही फक्त इडली, वडा, दोसा मिळते म्हणत त्याने चित्राकडे बोट दाखविले. हे सर्व त्याला आवडत नव्हते कारण हे खाल्याने पोट भरणार नाही याची खात्री होती. तरी त्याने एक प्लेटइडली वडा मागितला, कसेबसे खाऊन हॉटेलच्या बाहेर पडला. त्याच्या समोर एकच प्रश्न होता, हॉस्पिटलला कसे पोहचायचे. तो अनेकांना बोलूलागला मात्र त्याची मराठी भाषा त्यांना समजत नसल्यामुळे लोकंत्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. दूरवरून एक रिक्षावाला हे सारे पाहत होता. त्याने आपली तीन चाकी रिक्षा चालवत त्याच्याजवळ आला. जवळ येऊन म्हणाला, काय भाऊ, महाराष्ट्रातून आलात का ? त्या तेलगूच्या शहरात मराठी कानावर पडताच मोहन आनंदित झाला. देवासारखा भेटलास म्हणून मोहन म्हणाला, होय, मी महाराष्ट्रातून आलोय. तुम्हाला मराठी येते ? यावर तो रिक्षावाला म्हणाला, मराठी येते म्हणजे काय ? मी पण महाराष्ट्राचा आहे. हे एकूण मोहनला खुप आनंद झाला. हा माणूस आपणाला नक्की या हॉस्पिटलला पोहोचवेल याचा त्याला विश्वास मिळालं. थोडीफार चौकशी केल्यावर त्याने दवाखान्यात घेऊन जाण्याचे मान्य केले आणि रिक्षामधून त्यांचा प्रवास सुरू झाला. 

इथे कसे काय आलात ? 

गावकडे काम मिळेना म्हणून माझ्या एका मित्रांसोबत येथे आलो

ही रिक्षा तुमचीच आहे का ? 

नाही, ही रिक्षा मी भाड्याने चालवितो, रोजच्या रोज त्यांना किराया देऊन ही रिक्षा चालवितो. 

रोज किती पैसे मिळतात ? 

कधी कधी दोनशे तिनशे मिळतात तर कधी कधी खिशातून किराया द्यावा लागतो. 

तुम्हांला तेलगू बोलता येते का ? 

अगोदर येत नव्हती, पण हळूहळू कामपुरता तेलगू भाषा शिकून घेतली. 

खरंच माणसाला आपली भाषा आलीच पाहिजे सोबत शेजारच्या प्रातांतील भाषा येणे देखील आवश्यक आहे. 

होय, त्याशिवाय आपण दुसऱ्या राज्यात कसे जगू शकतो. 

बोलता बोलता हॉस्पिटल आले, मोहन रिक्षाच्या खाली उतरला, त्याचे भाडे चुकते केले आणि हॉस्पिटलमध्ये गेला. आज तो रिक्षावाला देवासारखे धावून आला म्हणून देवाचे त्याने मनोमन आभार मानले.


Rate this content
Log in