भारतीय असल्याचा अभिमान
भारतीय असल्याचा अभिमान


आजपर्यंत आपल्या देशात देशावर अनेक वेळा अतिरेकी हल्ले झाले आणि आपली क्षमता असताना देखील आपण कधी प्रतिउत्तर दिले नाही. आपला प्रतिकार म्हणजे काय प्रवक्त्याने निषेध करणे, लोकांनी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली देणे, कॅन्डल मार्च काढणे, इत्यादी इत्यादी परंतु ठोशास ठोसा असा जबाब आपण कधीही दिला नव्हता.
मोदी सरकारच्या काळामध्ये आपल्यावरती उरी हल्ला झाला आणि पुलवामा हल्ला झाला परंतु मोदीजींनी न बोलता त्याचे प्रतिउत्तर दिले म्हणजे पाकिस्तानला असे वाटले होते की दरवर्षीप्रमाणे यावेळी पण निषेध करून गप्प बसतील परंतु पुलवामा हल्ल्याच्या दहाव्या दिवशी आपण त्यांचे अतिरेकी तळ उध्वस्त करून जवळजवळ 300 अतिरेकी मारले आणि जवानांचा दहावा त्यांना अशाप्रकारे श्रद्धांजली देऊन केला त्यावेळी या देशाला मोदींसारखे पंतप्रधान लाभलेत आणि आपण भारतीय आहोत याचा खूप अभिमान वाटला.