Annapurna Sarvgod

Children Stories Comedy Horror

3.8  

Annapurna Sarvgod

Children Stories Comedy Horror

बालपणीची एक भूत -2

बालपणीची एक भूत -2

1 min
327


आम्ही सर्व मुलं खेळत खेळत गावाच्या बाहेर गेलो. खुप खेळलो.खेळायच्या नादात आम्ही विसरूनच गेलो की आम्ही आहोत कुठं.आम्ही जेव्हा घरी जायला निघालो तेव्हा जरा अंधार पडला होता. अम्हाला घरी जाताना खुप भीती वाटली. आम्ही सर्व मुलं लहान असल्यामुळे काही कळतच नव्हते. तसेच धाडस  करत करत आम्ही घरी यायला निघालो. येत असताना. आम्ही एकमेकांना भीती दाखवत  होतो. आमच्याकडे सगळे भूताला खूप घाबरायचे. फक्त लहान मुले नाही तर मोठी माणसं सुधा. आमच्या मनात भुताची भीती आमच्या घरच्यांनीच  भरवली. आम्हाला भीती दाखवत दाखवत ते सुद्धा घाबरु लागले.

   

आम्ही सगळे कसेबसे घरी गेलो. त्याच रात्री पासून आमच्या आत्त्याचा मुुलगा गणू खूप आजारी पडला. सगळ्यात जास्त तोच घाबरत होता.दोन दिवस त्याचा आजार काही कमी होत नव्हता औषध गोळ्या खाल्ल्या तरी काहीच फरक पडला नाही. आज्जी म्हणाली गावा बाहेर उशिरापर्यंत होते सगळे

त्यामुळे त्याला लागीर झाली. आता त्याला आपण गावच्या देेवरुशीण बाईकडे घेऊन जाऊ. संध्याकाळी सगळे कामात असताना मी हळूच गणूजवळ गेले. तो आजारी असल्यामुळेे पांघरुण घेऊन झोपला होता. मी  त्याच्या  कानात कुजबुजले कोन आहेस तू? असं मी 5, 6 वेेळा बोलले. तो आवाज आइकून ओरडला, सगळ्यांना सांगत सुटला. कुणाला माहीत नव्हतं की नक्की काय झालेे आहे.


सकाळी लवकर ऊठून आम्ही सगळे देवरूशिन बाईकडं गेलो. तिला सगळे सांगितलं. ती म्हणाली, त्याला लागीर झाली आहे. तीन लिंबू, मीठ, मिरची, अंडी, शिळी भाकर, कांदा, चटनी हेे सगळे त्याच्यावरुन उतरून टाकायला सांगितले. तेव्हा मला कळले की हे सगळं किती खरे आहे आणि किती खोटे.  


हा पण हे खरे आहे की हे सगळं  केल्यावर गणू पूर्णपणे बरा झाला आणि परत आम्ही सगळे एकत्र खेळू लागलो.


Rate this content
Log in