STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

बाबा

बाबा

1 min
225

बाप......

  बाईंमधील बा व परमेश्वर मधील प अशा दोन अक्षरांनी बाप शब्द बनला असावा.

      बाईमधील सहनशीलता अन परमेश्वरामधील संगोपन बाप या शब्दात उतरली आहे,

       बाप म्हणजे ज्यांनी आपल्याला जीवन दिले. स्वतः आयुष्यभर खस्ता खावून मुलांना सांभाळले.मुलांच्या साठी कष्ट केले.आणि कधीही ते चेहर्‍यावर न दाखवता सदैव आनंदात राहून मुलांचे संगोपन करणे.

    कामासाठी सकाळी बाहेर पडायचे.रात्री घरी यायचे.घराबाहेर पडताना मुले झोपलेली. घरी आल्यावर देखील मुले झोपलेली असतात बर्‍याच वेळी .कारण मुले दमून झोपून जातात.

      अशा वेळी बाबा घराबाहेर पडताना मुलांच्या डोक्यावर हात फिरवून जातात तर रात्री आल्यावर एक छानशी पापी घेतात. बाबांचा दिवसभराचा थकवा दूर होतो.

  असा बाबा प्रसंगी कधी धाकात घेतात कधी प्रेमाने जवळ करतात.मुलांच्या भविष्यासाठी पुंजी साठवतात.त्यांचे कधी चुकले तर रागावतात.संकटसमयी मुलांच्या पाठीशी उभे राहतात.

    माझे बाबा म्हणजे माझे दादा.खूप कष्ट करून आम्हा बहीण भावाला वाढवले.स्वतः दोनच कपडे वर्षभर वापरायचे पण आम्हांला मात्र छान कपडे दिले.खाजगी शाळेत  घातले.उत्तम शिक्षण दिले. माझ्या लग्नानंतर देखील सणवार ,वाढदिवसते कधीच विसरले नाहीत.पण गेली दोन वर्ष झाली जावून त्यांना (२० सप्टेंबर १९१७ ) आज या निमित्ताने पुन्हा त्यांचे स्मरण झाले.

  वडिलांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन