Nilesh Gogarkar

Others

3  

Nilesh Gogarkar

Others

अवखळ प्रेम (भाग 5)

अवखळ प्रेम (भाग 5)

6 mins
556


मागील भागावरून पुढे.......


दुसऱ्या दिवशी माधवी लवकर उठून आपली तयारी करत होती. जास्तीत जास्त कशी चांगली दिसेल असा तिचा प्रयत्न चालू होता..आईला आजपासून ती परत कॉलेज ला जातेय ह्याचा आनंद होता . आपल्या मुलांनी चांगले शिकावे आपल्या पायावर उभे राहावे अशी सगळ्याच आई बाबा ची अपेक्षा असणे ह्यात काही चूक नव्हते. आईला महेश ची चिंता नव्हती तो हुशार होता. सगळ्यांना सांभाळून घेणारा होता पण त्या उलट माधवी हट्टी , जेमतेम पास होणारी त्या मुळे तिचीच चिंता आई-बाबा नां कायम असायची.


आता पण तिचे चाललेले सगळे आई बघत होती. त्यावरून तिला जरा शंका आलीच होती. वर्षाचे पण न ऐकणारी काल शशांक येऊन गेल्यावर खूष होणारी माधवी आज कॉलेज ला पण जायला तयार झाली. त्या मुळे आईला साधारण कल्पना आली होती. त्यामुळे रात्रीच तिने महेश ला शशांक बद्दल विचारून घेतले होते. महेश चे मत त्याच्या बद्दल एकदम चांगले होते. त्याची माणसाची पारख कधी चुकायची नाही. त्यामुळे आई काही निश्चिन्त झाली होती.


" आई मी निघाली ग.... " आईला सांगून ती खाली आली.. कदाचित तो कॉलनी बाहेर आपली वाट बघत असेल असा तिचा अंदाज होता. आणी ती खाली यायला आणी तिचा मोबाईल वाजायला एकच गाठ पडली.


त्याचाच कॉल होता. मोबाईल बाहेर काढत ती खाली उतरली तर समोर तो उभा..


" अरे मला वाटले की तू कदाचित कॉलनी बाहेर उभा असशील..." तीने त्याला बघून परत मोबाईल खिशात टाकत ती म्हणाली.


" कां...? आपण काही चुकीचे करत नाही नां... मग असे लपून छपून भेटण्याची काही गरज आहे असे मला वाटत नाही. हवंतर आता तुझ्या घरी सांगतो की तू माझ्या बरोबर कॉलेज ला जातेस ते. त्यात काय एव्हडे.."


" त्याची काही गरज नाही... मी काल रात्री सांगितले आहे आईला.. तू चल नाहीतर इथेच उशीर होईल..."


" ह्म्म्म.. बस..." तो म्हणाला आणी ती बसल्यावर त्याने बाईक वळवून कॉलेज कडे चालवायला सुरवात केली. कॉलेज ला सगळे त्या दोघांना एकत्र बघून चाट पडले. वर्षा तर जाम खूष झाली. शशांक पिक्चरच्या वेळी तिच्या सगळ्या ग्रुप बरोबर भेटला होता त्यामुळे त्या सगळ्याशी त्याचा चांगला परिचय होता. काही वेळ त्या सगळ्याशी बोलून तो आपल्या क्लास कडे निघून गेला...


" काय ग त्या दिवशी मी म्हणाली तर कॉलेज ला यायला तयार नव्हतीस आणी मग आज काय झाले अचानक ? "वर्षा ने तिला काहीसे बाजूला घेत विचारले ...


" शशांक कॉलेज सोडून जाणार होता. म्हणून मला कॉलेज ला यावे लागले."


" आच्छा... असे आहे तर... पण मग तुला सोबत घेऊन कॉलेज ला आला कसा?"


" मला नाही माहीत.. काल म्हणाला मी येतोय तुला न्यायला आणी आला.."


" मग आजचा दिवस की रोजच..? " वर्षाने डोळे मिचकावींत विचारले.


" तू गप्प बस हा आता... सुता वरून स्वर्ग गाठू नकोस...

उगाच त्याच्या कानावर गेले तर परत तो पण चिडेल.."


" बरं बाबा मी काही बोलत नाही.. तू परत कॉलेज ला आलीस ह्यातच मला आनंद आहे..." वर्षा तिला मिठी मारत म्हणाली.


असेच दिवस जातं होते.. शशांक तिला न्यायला सोडायला घरी यायचा. दोघात चांगली मैत्री झाली होती. आणी फक्त मैत्री ह्या गोष्टीवर तो ठाम होता त्यामुळे तिने पण परत कधी त्याला प्रपोज केले नाही. आपण एक चांगले मित्र आहोत तर चांगले मित्रच राहू ह्या गोष्टीवर दोघांचे एकमत झाले होते पण त्यामागची दोघांची कारणे मात्र वेगवेगळी होती...

तिला मित्र म्हणून त्याचा सहवास मिळत होता. हक्कानी हट्ट करून त्याच्या कडून काहीही करून घेता येत असे जसे पिक्चर ला जाणे , शॉपिंग , फिरायला जाणे वैगरे... तर आता ती शहाण्यासारखी वागत होती. व्यवस्थित अभ्यास करत होती. कॉलेज ला नेहमी येत होती. म्हणून तो खुश होता... असेच दिवस जातं होते. आता त्यांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या..


" माधवी आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे हा... " तो म्हणाला.. तेव्हा ते दोघे पार्किंग मध्ये त्याच्या बाईक वर बसले होते.


" अजून दोन महिने आहेत परीक्षेला..." तिचे उत्तर...


" तेच म्हणतोय मी... की , दोनच महिने राहिलेत.. आता ह्याच्या पुढे एकमेकांना भेटणे बंद.. फोन करणे बंद.. आणी फक्त अभ्यास करायचा... कळले कां ?"


" ए मला नाही जमणार हा... तुझ्याशी बोलल्या शिवाय माझा दिवस जातं नाही.. आणी हे तुला पण माहित आहे.."


" हो पण तरीही... जमवायलाच हवे.. उद्या पासून फक्त अभ्यासच करायचा इकडे जायचे , तिकडे जायचे सगळे बंद काय..?"


" बरं..." ती म्हणाली पण त्याच्या शिवाय दोन महिने काढायचे म्हणजे तिच्या अंगावर काटा आला.. ह्या मागील काही महिन्यात तिला त्याची एव्हडी सवय झाली होती की ते कठीण काम होते.


" मग आज आपण कुठे तरी फिरायला जाऊ... आता दोन महिने जास्त भेटणार नाही तर आज तरी कुठेतरी जाऊया..."


" बरं.. बोल कुठे जायचे .." त्याने विचारले..


" कुठे ही... तू नेशील तिथे... तू सोबत असलास तर मला काय कुठे ही गेलो तरी चालेल... " ती पटकन म्हणाली आणी तिने जीभ चावली.. तो डोळे मोठे करून बघत होता.


" ठीक आहे चल... " त्याने खिशातून बाईक ची चावी काढली तशी ती बाईक वरून उतरली..


" बस.... " त्याने बाईक स्टार्ट करत तिला म्हंटले. तशी ती त्या बाईकवर पुन्हा बसली... त्याने बाईक सरळ आरे मधील एका शांत जागी वळवली. दुपारची वेळ असल्याने आसपास कोणी नव्हते.. एका छानश्या जागी बाईक लावून दोघे बाजूला एका बेंच वर बसले. मग किती वेळ दोघे गप्पा मारत होते त्याचे त्यांना माहीत नाही.. काळोख पडायला सुरवात झाली आणी तिचा मोबाईल वाजायला लागला.


" हॅलो.."


" ......."


" अग आई आम्ही बाहेर आलोय... कॉलेज मधून सरळ इकडेच आलो.."


" .........."



" अग आहे. शशांक आहे माझ्या बरोबर.. काळजी करू नको.."


" ..........."


" येतो आम्ही थोड्या वेळाने घरी..."


" ............"


" हो... लवकर येतो... " म्हणून तिने मोबाईल ठेवला..


" तुझ्या घरी कोण कोण आहे..?" तिने त्याला विचारले.


" माझ्या घरी आई , वडील , काका त्यांची फेमिली असे आमचे सगळे एकत्रच राहतो... बाबाचा मोठा बिजनेस आहे.. पण ते अजून पण काहीसे जुन्या विचाराचे आहेत. लव्ह मॅरेज वैगरे त्यांना पसंद नाही म्हणून तर मी तुला आधीच सांगितले होते माझ्या घरी हे चालण्या सारखे नाही..."


" आमच्या घरी मात्र असे काही नाही... मुलांनी आपले निर्णय स्वतः घ्यावेत. अगदीच गरज असेल तरच आईबाबा त्यात हस्तक्षेप करतात... अगदी लग्ना सारखा विषय पण त्यांनी आमच्यावर सोपवला आहे. फक्त जे काही असेल ते आम्हाला सांगायचे एव्हडीच माफक अट त्यांची आहे."


" चांगले आहे ग तुमचे... आमच्या घरी बाबा समोर कोणी तोंड वर करून पण बोलत नाही..." तो काहीसा कष्टी आवाजात म्हणाला...

" मला पण वाटते ग आपण पण थोडी फार मज्जा करावी. इतर सर्व सामान्य मुला सारखे जगावे.. पण प्रत्येक वेळी आमची सरदारकी आडवी येते..."


" सरदारकी...? " ती न समजून उदगारली...


" अग आमचे खानदान सरदाराचे आहे. माझे पूर्वज छत्रपतीच्या सैन्यात सरदार होते... पंचवीस हजार सैन्य आमच्या हाताखाली होते. आम्ही राहतो तो गाव आणी आजूबाजूच्या परिसर आम्हाला इनाम दिलेला होता. आता त्यावर पाच पिढ्या झाल्या. पण त्या गोष्टीचा बाबा आणी काका नां जाम अभिमान आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आपल्या इभ्रतीला शोभेल की नाही ह्याची खातरजमा केल्या शिवाय करत नाहीत.. पण कधी कधी ह्या गोष्टीचा इतका अतिरेक होतो की सगळे नको वाटते... " तो दुःखी आवाजात म्हणाला. त्याचा कंठ दाटून आला होता.


" तुला काय वाटते मला नाही कां वाटत आपण पण चार चौघासारखे मज्जा करावी. पण मला डॉक्टर बनायचे आहे.. बाबा नी आधीच ते ठरवून टाकले आहे.. म्हणून मी फक्त अभ्यासात लक्ष गुंतवून ठेवतो..

आज खरं सांगतो तुला नाही म्हणालो पण त्याचे खरे कारण हेच आहे. नाहीतर तुझ्यात एखाद गुण सोडला तर तू काही वाईट नाहीस..." तो सावकाश म्हणाला. त्याच्या तोंडून ही कबुली ऐकून ती अवाक राहिली. क्षणभर कोणी काही बोललेच नाही.


" माझ्यात असा काय वाईट गुण आहे...? "


" तू डोक्यावर पडलेली आहेस.. कोणाशीही भांडण करायला तयार.. " तो हसून म्हणाला तशी ती गाल फुगवून बसली.


" पण आता मी बदलली आहे नां .. "तिने थोड्या रागातच त्याला आठवण करून दिली.


" बदलली आहेस पण किती दिवस तेच आता बघायचे आहे... "


" ह्म्म्म.... "


" चल आता घरी जाऊया... आई वाट बघत असेल... "


" चल... " उठताना त्याने तिच्या समोर हात धरला.. आधारा साठी आणी त्याचा हात आपल्या हातात घेतल्यावर तिला पहिल्या दिवसासारखेच जाम भारी वाटले. त्याची ती ऊबदार काहीशी राकट पकड.. पुन्हा एकदा तिच्या मनाला स्पर्शून गेली...



पुढील भाग लवकरच....




Rate this content
Log in