Nilesh Gogarkar

Others

3  

Nilesh Gogarkar

Others

अवखळ प्रेम (भाग 2)

अवखळ प्रेम (भाग 2)

7 mins
817


मागील भागावरून पुढे.....


तिचा निरोप घेऊन जाताना शशांक ने दिलेली किलिंग स्माईल माधवीला घायाळ करून गेली. आता ती रोज त्याला पाहायलाच कॉलेज ला यायला लागली. रोज त्याला कॉलेज मध्ये बघून तिला खूप समाधान वाटायचे आणी ज्या दिवशी तो तिला दिसला नाही तिची चिडचिड व्हायची. अधेमध्ये दोघांची कॉलेज मध्ये भेट व्हायची पण त्या वेळी ओळखीची कोणतीही खूण शशांक च्या चेहऱ्यावर उमटायची नाही हे बघून ती चकित झाली.

शेवटी ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा हे ठरवून ती आज कॉलेज ला आली. थोडा वेळ शोधाशोध केल्यावर तिला तो सापडला.


" हाय... " ती त्याच्या जवळ जातं म्हणाली.


" हाय " अनोळखी नजरेने बघत त्याने प्रतिउत्तर दिले.


" मला ओळखले नाहीस कां ?"


" नाही..." तो भाबडेपणे बोलून गेला. आणी तिच्या कपाळावर आट्या पडल्या.. असा काय हा..? तिच्या सारख्या सुंदर , तारुण्याने मदमस्त तरुणीला ओळखत नाही म्हणजे काय?


" अरे त्या दिवशी नाही काय मी तुला क्लास सांगितला होता. पहिल्या दिवशी... " ती आठवण करून देत म्हणाली..


" अरे हो.... सॉरी हा ! मी त्या वेळी तुमच्या कडे फारसे लक्षच दिले नाही. मी जरा घाईतच होतो नां... आणी नंतर मला ते लक्षातच राहिले नाही..." त्याच्या अश्या बोलण्याने तिचा चेहरा पडला.. जो धड तिच्या कडे बघायला तयार नाही त्याच्या कडून प्रेमाची अपेक्षा कशी करू शकत होती. ती आपल्याच विचारत शांत उभी राहिली.


" काही काम होते कां माझ्या जवळ?"


" नाही सहजच आले होते. म्हंटले आणखीन काही अडचण तर नाही..."


" नाही आता आणखीन कसलीही अडचण नाही..."


" बरं... " असे बोलून ती वळली... त्याच्याशी अजून काही वेळ बोलावे असे तिच्या मनात होते पण त्याचा तो थंड प्रतिसाद बघून ती परत फिरली.


" आलीस त्याला भेटून ? " वर्षा ने विचारले.


" कोणाला ?"


" तुझ्या पिल्लू ला... " हसत वर्षा ने म्हंटले. त्या बरोबर माधवी भडकली आणी तिने एक धपाटा तिच्या पाठीत हाणला..


" आईगं.... मूर्ख लागले नां..."आपली पाठ चोळत वर्षा डाफरली.


" मग तुला कोणी आगाऊपणा करायला सांगितले होते."


" तू त्याच्यावर खूप प्रेम करतेस हे मला काय सांगायची गरज नाही. ते तुझ्या डोळ्यातून, हावभावातून दिसतेच आहे. त्याला बघायला तुझी चाललेली धडपड मला माहित आहे.."

" अग... दुसरी कोणी विचारायच्या आत तू त्याला विचारून टाक. " वर्षा पुढे म्हणाली. तिचे म्हणणे खरे होते. पहिल्यांदाच तिला कोणी मुलगा एव्हडा आवडला होता. त्यामुळे त्याला तिच्या मनातील भावना कळणे गरजेचे होते...


" ह्म्म्म... लवकरच मी त्याला विचारून टाकीन..."


त्या दिवसा नंतर माधवी त्याचे निरीक्षण करू लागली. तो काय करतो , त्याला काय आवडते , त्याला कोणत्या गोष्टीची चीड येते.. त्यातून एक गोष्ट लवकरच लक्षात आली की तो खरोखर अगदी शांत राहणारा मुलगा होता. कोणाच्या अध्यामध्यात पडणे त्याच्याने व्हायचे नाही.. कोणाशी मोठ्या आवाजात बोलणे , भांडणे करणे ह्या सगळ्यापासून तो खूप लांब होता. माणसाने शांत असावे ह्यात दुमत नाही. पण किमान अन्याय होत असताना तरी त्याने त्याला विरोध करावा... असे तिचे मत होते. तेव्हडे एक सोडले तर तो अगदी चांगला मुलगा होता. शेवटी एकदिवस मनाची तयारी करून ती त्याला विचारणार होती. त्या दिवशी ती अगदी नटून थटून कॉलेज ला आली. गेट समोरील बेंच वर बसून ती त्याची वाट पाहत होती.. तो नेहमी साडे आठ वाजता कॉलेज ला येतो हे तिने हेरून ठेवले होते.

आता पण तो नेहमी प्रमाणे बरोबर साडे आठ वाजता कॉलेज ला आला. आजूबाजूला कोणाकडे न बघता तो सरळ त्याच्या क्लास कडे चालू लागला.माधवीने त्याला पाहिले तशी ती लगबगीने त्याच्या दिशेने निघाली.


" शशांक..." तिने हाक मारली. तसा तो गोधळून थांबला. कोण्या मुलीने त्याला हाक मारावी इतकी कोणत्याही मुली बरोबर अद्याप त्याची मैत्री झाली नव्हती आणी त्याला करायची पण नव्हती.


" हाय...क्लास ला अजून वेळ आहे नां..?"


" हो... नऊ वाजता लेक्चर आहे.. कां?"


" मला तुझ्याशी थोडे बोलायचे होते..."


" माझ्याशी..? काय ?"


" इथे नको... आपण तिथे बसुया कां ? " तिने आजूबाजूला पाहत विचारले. त्यावर त्याने मनगटावरील घड्याळात पाहिले.


" फार वेळ नाही घेणार... फारतर दहा पंधरा मिनिटे..."


" बरं चला.. " दोघे तिच्या आवडीच्या बेंच च्या दिशेने निघाले आणी तेव्हड्यात गेट वरून काही मुले धावत आली.


" शशांक ! त्यांनी पुन्हा भांडणे उकरून काढली... आणी अभि ला पण मारत आहेत... लवकर चल.. " ती मुले घाई घाईने सांगू लागली. त्यांचे बोलणे ऐकून शशांक पण धावत त्यांच्या मागे निघाला.. त्याचे हे नवीन रूप तिच्या साठी पण नवीनच होते. काय होतेय ते बघायला ती पण त्यांच्या मागे गेटवर धावली. पण....


ज्या त्वेशाने शशांक गेटवर धावला होता ते बघता आज तो आपली ताकत दाखवणार अशी जी तिची समजूत होती तिला छेद देत शशांक त्या मवाली मुलांच्या समोर हात जोडून गयावया करत होता.


जाऊदे नां.... भाऊ... आता झाली नां चूक... सॉरी पण म्हणून झाले... आता कशाला विषय वाढवतो आहेस... शशांक त्या सगळ्यांना समजावत होता. तिला ते बघून इतका राग आला. एव्हडी छान मस्त कमावलेली बॉडी काय चाटायची आहे..? जर तिचा कुठे उपयोगच करायचा नसेल तर कशाला हे लोक जिम लावतात.. तिच्या मनात असंख्य विचार आले. थोड्या वेळाने सगळे शांत झाले तशी मुले कॉलेज ला निघाली.. ह्या सगळ्या गडबडीत त्याचा पिरियड चुकला होता..


" ह्म्म्म बोला काय म्हणायचे होते..." तो परत तिच्या कडे वळला..


" सांगते...आणी प्लिज मला अहो जाओ करू नकोस नां. मला ते आवडत नाही. एखाद्या काकूबाई सारखा फील येतो.."


" बरं.. " तो गालातल्या गालात हसत म्हणाला. दोघे हळू हळू चालत बेंच वर जाऊन बसले..


" शशांक... आय लव्ह यु... " आपली सगळी हिम्मत गोळा करून तिने म्हंटले. पण त्या पेक्षा एखाद्याला मारायला सांगितले असते तर ते सोपे असेच तिला वाटायला लागले होते.


" काय ?" शशांक दचकला... आणी नंतर खो खो हसू लागला... त्याच्या तश्या वागण्याने तिचा पारा आणखीन तापायला लागला..


" त्यात हसण्या सारखे काय आहे ? " तिने रागानेच विचारले.


" हसू नको तर काय करू ? मला धड ओळखत नाहीस. माझ्या बद्दल काहीही माहिती नसताना माझ्यावर प्रेम करूच कसे शकतेस..?"


" कां बघता क्षणी प्रेम होऊ शकत नाही ?"


" मग तर तुझ्या पासून लांबच राहिले पाहिजे माझ्या पेक्षा सुंदर तर अमीर खान पण आहे. मग त्याला बघितलेस तर त्याच्यापण प्रेमात पडशील..." तो अगदी शांत आवाजात म्हणाला..


" असे तुला वाटतेय..."


" वाटत नाही हे तू बोलतेस.. बघता क्षणी प्रेम वैगरे सगळे झूठ आहे... अर्ध्या पेक्षा जास्त लोकांचे रिलेशन सहा महिन्या पेक्षा जास्त टिकणार नाहीत.. त्या मुळे प्रेमा बद्दल मला नको सांगू.... आणी मी इथे शिकायला आलोय त्यामुळे ह्या अश्या फालतू गोष्टी कडे लक्ष द्यायला मला अजिबात वेळ नाही आणी तू पण तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे तेच तुझ्या साठी उत्तम आहे..."


" थोडा विचार करून बघ नां... " तिच्या स्वरात आर्जव होते..


" मी एकदा ठरवले की पुन्हा पुन्हा त्यावर विचार करत बसत नाही.. त्यामुळे ह्या पुढे हा विषय माझ्या समोर काढायचा नाही..." त्याने तिला सख्त बजावले... ती आतून कमालीची तुटून गेली. कोणत्याही क्षणी आपल्या डोळ्यातून अश्रूचा महापूर येईल अशी तिला भीती वाटत होती. पण तो बाजूला असताना रडणे तिला कमीपणाचे वाटत होते म्हणून ती कशीबशी आपले अश्रू दाबून बसली होती.


" मी येतो... माझे दुसरे लेक्चर आहे..." असे म्हणून तिच्या परवानगीची वाट न पाहता तो निघून गेला आणी इथे तिने अश्रू नां वाट मोकळी करून दिली.. बराच वेळ अश्रू गाळल्यावर तिला जरा बरे वाटले.. त्याने दिलेला नकार मात्र तिला आत कुठे तरी खोल जाऊन भिडला होता... वर्षा तिची समजूत काढत होती. तिनेच तिला सांगितले कदाचित तिची अँग्री वूमन ही प्रतिमा बघूनच त्याने नकार दिला असावा. नाहीतर दिसायला किव्हा इतर कोणत्याही दृष्टीने माधवी चार चोंघीत उठून दिसणारी होती. मग असे कां व्हावे...


त्या दिवसा पासून माधवी एकदम बदलली.. नेहमी कोणालाही भिडणारी माधवी एकदम शांत शांत आणी अबोल झाली. आपल्या विचारत कायम मग्न असायची. जेवणावर लक्ष नाही की अभ्यासावर लक्ष नाही. तिची अशी अवस्था लवकरच घरच्यांच्या लक्षात आली. पण त्या मागचे कारण काय असावे हे मात्र कोणाला ही माहीत नव्हते...


हळू हळू दिवस जाऊ लागले.. माधवी हळूहळू आपल्या पूर्वपदावर येईल अशी जी आशा वर्षाला होती ती पण फोल ठरली. तिच्या स्वभावात कणभर ही फरक पडला नाही. आधी हसणारी खिदळणारी माधवी आता एकदम शांत शांत झाली होती. तिची अवस्था बघून वर्षाला शशांकचा खूप राग येत होता. त्याच्या नकारामुळेच हे सगळे घडले होते. त्यामुळे ती शशांक शी फटकून वागे.. आता तर महेश आणी शशांकच्या मध्ये छान मैत्री झाली होती. दोघे कधी कधी एकमेकांशी बोलताना दिसायचे. शशांक ला बघितले की माधवीच्या चेहरा उजळायचा... पण तो अजून पण तिच्या कडे लक्ष दयायला तयार नव्हता...

अशातच एके दिवशी माधवीला कॉलेज मधून निघायला उशीर झाला..कॉलेज मध्ये एन्युअल डे असल्यामुळे खूप तयारी करायची होती. ते सगळे करण्यात खूपच उशीर झाला. काळोख पडायला सुरवात झाली होती. तिच्या कॉलेज जवळून बस मिळणार नाही ह्याची खात्री असल्यामुळे ती पायी पुढे निघाली. पुढील स्टॉप वरून तिला बस मिळू शकत होती. आपल्या नादातच ती मान खाली घालून चालत होती. कॉलेज च्या पुढेच काही मवाली मुले बाईक वर कुचाळक्या करत बसली होती. माधवीला एकटी बघून त्यांना आणखीन जोर आला. ते तिला मुद्दाम छेडू लागले. अश्या गोष्टीचा माधवीला आगोदरच खूप राग यायचा त्यामुळे तिने मागचा पुढचा विचार न करता त्यांच्यातील एकाच्या सरळ कानाखाली लावून दिली. पण ती हे विसरली की ही काही कॉलेज मधली मुले नाहीत. मवाली आहेत. तिच्या कानाखाली मारण्याने ते सगळे भडकले. त्यांनी पटापट बाईक वरून उद्या मारल्या आणी तिला घेरले. एकाने पुढे येत तिचा हात धरला.


" जाम माज आलाय नां तुला... आज तुझा सगळा माज उतरवतो..." त्याने तिला घट्ट पकडत काहीश्या आड बाजूला ओढायला सुरवात केली.. आज आपल्यावर खुप गंभीर प्रसंग ओढवला आहे ह्याची तिला जाणीव झाली.. ती सर्व शक्तीनिशी हात पाय झाडू लागली... पण त्याच्या शक्ती समोर तिचे काहीच चालत नव्हते. तिने आजूबाजूला मदती साठी पाहिले... पण आता पर्यंत रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.. आसपास कोणी नव्हते. आज काही आपले खरं नाही असाच विचार तिच्या मनात आला...



पुढील भाग लवकरच.....


Rate this content
Log in