अतूट नाते
अतूट नाते


शिक्षक व विद्यार्थ्याचे असे नात आहे की आई..मूल...
मूल शाळेत येते अवघे सहाव्या वर्षात.कुटुंबातून समाजात येते. आईचा पदर सोडून शाळेत आईसमान बाईंचा पदर धरते.
बाईंची प्रत्येक कृती निरीक्षण करतो.तसे वागतो अगदी घरीदेखील. बाईंचा प्रत्येक शब्द मानतो.
मुलाचे व शिक्षकाचे नाते खूपच वेगळे.अतूट बंधन ...,
लहान वयात संस्कार होतात .मुल शिक्षकांच्या प्रत्येक हालचाली टिपतो.त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मान्य करून तशी कृती करतो.
वर्गात आल्यावर शिक्षकांवर होणारा प्रेमवर्षाव मनास आनंद देतो.
मी चौथीच्या वर्गाला शिकवायला होते.सन १९९९ मधे. त्या मुलांना माझा लळा खूप...आता ही मुले खूप मोठी झाली आहेत. ५ सप्टेंबरला २०१७ ला मुले माझ्या घरी आली.आम्ही gettogether केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला. मला आणि मुलांना खूप आत्मिक समाधान मिळाले.
आजही बर्याच मुलांचे फोन गुरूपौर्णिमा आणि शिक्षकदिनाला येतोच. मन सुखावते.
असे हे नाते अतूट नाते मी आयुष्यात विसरणार नाही..
हे देवा मी खूप आभारी आहे मला शिक्षक बनवलेस.
या विषयावर अनेक नातेसंबंध लिहिता येईल,..