Mina Shelke

Others

3  

Mina Shelke

Others

असे लग्नाळू

असे लग्नाळू

4 mins
16.1K


सकाळी ५ वा. फिरायला जाताना दोन मुली स्कुटीवर तोंडाला पूर्ण रुमाल बांधून मोबाईलवर बोलताना ब-याचदा दिसतात एक तास फिरून येईपर्यंत एकीचा फोन सुरुचं असतो ....ते दृश्य बघून मनात काही प्रश्न निर्माण झाले ते असे....... आजकालची तरुण मुलमुली एवढी बिनधास्त आणि अविचारी का वागतात !

बघा आता घरातून बाहेर काँलेजला अथवा ट्युशनला म्हणून निघतात आणि इकडे वेगळेच प्रकरण सुरू असते ...आईवडिलांना वाटते आपलं मुल चांगले शिक्षण घेतय. कसोशीने अभ्यास करतयं फ्युचरसाठी धडपडतय या भ्रमात बिचारे आपली हौसमौज बाजूला ठेवून लेकरासाठी गाडी ,पेट्रोलचा खर्च , हल्ली स्मार्टफोन म्हणजे मुलांची गरज असे वाटते म्हणून दहा दहा वीस वीस हजारांचे महागडे मोबाईल घेऊन देतात , आपल्याला मिळाले नाही म्हणून रिक्तहस्ते सर्व करतात ....कुणी म्हणेल आईवडील चुकतात मुलांना एवढ्या सुविधा द्यायलाच नको .....पण होत काय हल्लीची मुलं एवढी भावनिक करतात आणि प्रसंगी आईबापाला जरबेत धरतात की पर्याय उरत नाही अनेक प्रकारे ...कारण शेवटी पोटचा गोळा त्यांच्या दुःखी पाहू शकत नाही .मुलांच्या इच्छेप्रमाणे केले तर तो जाणीव ठेवून स्वप्न पुर्ण करेल ही आशा .... सर्वच मुलं बेजबाबदार आहेत असं मुळीच नाही ... बरेच प्रमाणात आहेत हेही तितकंच खरं.

कोणतेही आईवडील मुलावर चांगलेच संस्कार करतात लहान आहे तोपर्यंत आलबेल असते जशी जशी मोठी होतात त्यावेळी आजूबाजूचा परीसर, मित्रमैत्रिणी शिकतात तिथले वातावरण या गोष्टीचा एक संस्कार घडत असतो .काहीजन चांगल्या गोष्टी आत्मसात करतात तर काही बहकतात ,... सुरुवात होते मग खोटं बोलन , कुटुंबात संवाद कमी करणे वेगवेगळी कारणे देऊन जास्त वेळ घराबाहेर राहणे .लपूनछपून व्यसन करणं इत्यादी इत्यादी ....त्यांच्यातील बदल सजक पालकांना जाणवतो ते प्रयत्न ही करतात बोलत करण्याचा नाही सहकार्य मिळत मुलाकडून ...हतबल झालेले पालक समाज भिती आणि पाल्य काही अघटीत कृत्य करेल या भितीपोटी गप्प बसून जे चाललयं ते पाहून कासावीस होण्यापलिकडे काही करू शकत नाही.

पूर्वी मुलगी वयात आली आणि मुलाला मिसरूड फुटले की घरच्यांच्या पसंतीने लग्न जमवत व विवाह होत असे कधी कधी वाटते खरचं योग्य निर्णय होता तो ....लवकर लग्न झाल्यामुळे आत्ता घडतात तसे प्रकार तरी घडत नव्हते . अज्ञान का असेना पण संस्कृती, परंपरा, मानमर्यादा, जतन तरी होत्या . सज्ञान झाले पण बिघडले स्वत्रंत्रेचा अर्थ स्वैराचार झाला. जिथे कशाचीच चाड नाही भीड नाही .

प्रेम ही एक सुंदर भावना आहे . जर विवेक असेल तर अतीसुदंर .

हल्लीचे प्रेम म्हणजे फँशनप्रमाने रोज बाँयफ्रेन्ड आणि गर्लफ्रेंड बदलते , याला प्रेम कसं म्हणू शकतात ही मुलं ,अशा प्रेमाच्या नादात मुलं स्वतःच फ्युचर ,नेचर पार विसरून जातात . काँलेजच्या नावाखाली डेटवर जाणे ,हाँटेल , पिक्चर आणि काय काय करत बसल्याने धड अभ्यास नाही धड गुणवत्ता नाही फक्त हेलपाटे चालू ...अन आईबापाचा कष्टाच्या पैशाची कदर नाही . होऊ दे खर्च ही मानसिकता

काहीचं प्रेम तर भलतेच उतावळं...एकनिष्ठ लग्न करीन तर तुझ्याशीच या आणाभाकात पक्क गुतंलेल.... एक दिवस काँलेजला जातो म्हणून सांगून जातात अन जातात पळून यांना साथ द्यायला चारसहा मित्रमैत्रिणी मोठी लढाई जिंकून दिली या अविर्भावात रात्र होते दोघांच्या घरी शोधाशोध ,काळजी मित्रमैत्रिणींना विचारले तर ते खरं सांगत नाही मग आईबाप हवालदिल होऊन सैरभैर शोधत फिरतात पण यांचा काही तपास लागत नाही ....मोबाईल स्विच आँफ कुणाला विचारावे अन सांगायचे कुठल्या तोंडाने यक्षप्रश्न ....अशा पळून जाणाऱ्या मुलामुलींना न घरच्यांची पडलेली ना समाजाची ....कसलाही विचार यांच्यासाठी महत्त्वाचा नसतो ना स्वतःच्या इज्जतीचा ना घरच्या इज्जत ,अब्रू ही गोष्टचं मुळी यांच्या खिजगणतीत नाही .

काहीचा तर कहरच ऐन लग्नाच्या वेळी पळून जातात निर्लज्जपणे घराण्याची अब्रू ,इज्जत समाजात घरच्यांची निंदानालस्ती होईल हसू होईल काहीच पर्वा नाही ...पळूनचं जायचे होते तर कमीतकमी कल्पना तरी द्यावी न चारचौघात होणारा तमाशा तरी टळेल पण..... नाही तुमची तेवढी सुध्दा हिम्मत नाही रे पळकुटेपणा करून काय असा तीर मारता तुम्ही हवा उतरली की येताचं न घरी लाचार होऊन अन मागता न आश्रय

काय स्टेटस रे तुमचं आईबापाच्या जीवावर पोसून त्याच्यांच तोंडाला काळ फासता अगतिक करता कसले असे प्रेम ..... शारीरिक सुखाची लालसाच ती दुसर काही नाही .खर प्रेम दुसऱ्याला आनंदी करतं स्वतःहा त्याग करेल पण दुःख देऊन सुख कधी मागत नाही. चारचौघात शरमिंदा नाही करणार कधीच.

शिक्षण अर्धवट , धड नोकरी नाही राहयला घरदार नाही जिव्हाळ्याची माणसं सोबत नाही अशा परिस्थितीत नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे हळूहळू प्रेमाची नशा उतरते जेव्हा रोजचं जीवन जगताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते तेव्हा भानावर येतात ...तोपर्यंत दोघामधे खटके उडायला सुरुवात होते ... तुझ्यामुळे ,तुझ्यामुळे एकमेकांना दोष देऊन मानसिकरित्या विकलांग व्हायला लागतात मग घरच्यांची आठवण होते ,मायाप्रेम समजते कुणा नातेवाईक अथवा आईच्या भावनिक स्वभावाचा गैरफायदा घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न करतात ..काही वेळा काही ठिकाणी अशा मुलांना आईवडील कठोर भूमिका घेऊन बाजूला सारतात पण.... काही दिवसांनी सामावून घेतात ....शेवटी आईबापचं ते...

प्रेम होणे ,करने वाईट नाही हो ...हल्लीची मुलं जाणती आहेत सुशिक्षित आहेत त्यांनी अशा गोष्टी करताना विचार करायला हवा ...आपण काय आहोत ,कोण आहोत ,आपले फ्युचर काय कुटुंबाप्रती, समाजाप्रती आपले कर्तव्य काय शिक्षण अर्धवट सोडून प्रेमाची भूलभुलैयात गुंतून काय साध्य करणार ! मनस्ताप आणि पश्चाताप ,हेटाळणी याशिवाय काय मिळते हो ...क्वचित असे विवाह टिकतात ,फुलतात

कुठल्याही गोष्टींची एक योग्य वेळ असते .आधी शिक्षण पूर्ण करा घरच्यांना विश्वासात घेऊन मनातले सांगून तर बघा ते तयार ही होतील तुम्ही तुमची वैवाहिक जबाबदारी पेलण्यासाठी आधी सक्षम तर व्हायला हवे न दोन्हीकडून एकमेकासाठी अनुरूप आहात पटल्यावर होकार देणारच सध्या समाज आणी कुटुंब मानसिकता बरीच बदलेली आहे .पूर्वीप्रमाणे फक्त विरोधच नाही होत फक्त तुम्ही लव्हमँरेज करताना जोडीदार म्हणून ज्याला निवडता तो सुयोग्य आहे की नाही विचार जरूर करावा .

प्रेम म्हणजे विवेक ,समंजसपणा , वैचारिकता, संयम , आत्मभान , कर्तव्याच्या जाणीवा ,स्वतःपुरता विचार न राहता व्यापक दृष्टीकोन ,मानमर्यादा , संस्कार ,संस्कृती सोबत घेऊन ....भान ,जाण ठेवून आयुष्याच्या सुदंर वळणावर घेतलेला योग्य निर्णय नक्कीच आनंददायी आणि परीपूर्ण ठरेल .


Rate this content
Log in