Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

अनुभव पावसाळा

अनुभव पावसाळा

1 min
203


   वसुधा फलटण शहरी मलठण या ठिकाणी राहत होती.मधे नीरा नदी होती.नदीच्या एका बाजूला फलटण तर एचा बाजूला मलठण .वसुधाची शाळा फलटणमधे होती.

    ऐन पावसाळ्यात मात्र नदी दुथडी भरून वाहायची.एरवी मात्र शांत असायची. वसुधा वडील व लहान भावाबरोबर ,नितीनबरोबर रोज सकाळी सहाला घर सोडायची शाळेत जाण्यासाठी.

   एके दिवशी शाळेत पोहोचलो त्या वेळी वातावरण ढगाळ होते पण पाऊस नव्हता. शाळेत पोहोचलो नी पावसाने धरेवर बरसायला सुरुवात केली ती अगदी जोरात कोसळला.सगळीकडे पाणीचपाणी झाले,

  वसुधाचे वडील नोकरीला सकाळी सातला हजर राहायचे त्यांची ड्युटी तीनला संपायची.आईने त्यांना फोन करून सांगितले "आज मुलांना तुम्ही आणा नदीला पाणी आलेय .मी घरचे पाहते." वडील टेलीफोन खात्यातच होते.

   वडिलांनी भावडांना शाळा सुटल्यावर कोसळत्या पावसातच ऑफीसवर नेले.साहेबांना विचारून मुलांना घेवून घरी निघाले.

   मधे नदी आली नदीला बरेच पाणी होते पण माणसे जाताना दिसत होती.

वडिलांनी डेअरिंग करून भावडांना घट्ट हाताशी धरले व नदी पार करू लाघले मधोमध आल्यावर पाणी जास्त वाढल्यासारखे वाढले.

   वडील जरा घाबरले त्यांनी भावाला डोक्यावर घेतले वसुधाला काखोटीला घेतले ,दफ्तर खांद्याला होतीच.तशा अवस्थेत भरभर नदी पार करत होते.खाली पायाला छोटी रोते लागत होती खडे वाहून आलेले लागत होते.पण नदी पार केली अक्षरशः कमरेवर पाणी होते.

  अशा अवस्थेत नदी पार केली .हुश्श झाले.पण आजही तो प्रसंग सांगताना ते क्षण अनुभवते...

आलेल्या प्रसंगचशी तोंड देणे हे त्या वेळी लहान होते पण मनी बिंबले गेले.



Rate this content
Log in