Jyoti gosavi

Others


5.0  

Jyoti gosavi

Others


अनोळखी

अनोळखी

2 mins 481 2 mins 481

होय मी एका अनोळखी पुरुषाबरोबर एक दिवस घालवलेला आहे, तो पण रात्रीच्या वेळी.  

तेव्हा मी दाभोळ येथे आरोग्य खात्यात नोकरीला होते. माझं गाव सातारा, त्यामुळे नेहमी सातारा दाभोळ अशा फेर्‍या व्हायच्या. एकदा मी सकाळी गाडी पकडून निघाले आणि दाभोळ येथे पोहोचण्यासाठी दापोली दाभोळ ही शेवटची मुक्कामाची गाडी मला मिळाली . शेवटचा स्टॉप आल्यानंतर

बस मधून उतरताना एक तरुण मुलगा सर्वांना विचारत होता इथे एखादं हॉटेल आहे का? इथे काही राहण्याची सोय होईल का परंतु त्याला कोणीच उत्तर देत नव्हते जो तो आपलं घर गाठायचा मागे होता तशी मी पण त्या गावांमध्ये "उपरी" होते, कधीकाळी नोकरीवर हजर होण्यासाठी मी पण माझ्या वडिलांना घेऊन अशीच तेथे रात्रीची उतरले होते आणि प्रत्येकाला मुक्कामाची काय सोय होईल का? म्हणून विचारत होते. एकाने धक्क्यावर धर्मशाळा आहे असे सांगितले. धर्मशाळा बघायला गेलो तर, एकदम अंधारी जागा आत मध्ये जनावरे आश्रयाला थांबलेली. अशा ठिकाणी राहणे शक्य नव्हतं .एक तरुण मुलगी व तिचे म्हातारे वडील यांना अशी धर्मशाळा दाखवताना त्या दाखवणाऱ्याला थोडी सुद्धा लाज वाटली नाही. मग मी त्यातून युक्ती काढून रिक्षावाल्याला म्हणले मला कोणत्याही नर्सच्या घरी घेऊन जा व ही माझी युक्ती लागू पडली आणि माझ्या कलिगने माझी आणि वडिलांची राहण्याची सोय केली मी अशा प्रसंगातून गेल्यामुळे मला त्या मुलाची दया आली आणि त्याला मी माझ्या घरी येण्याचे आमंत्रण दिले तो दुसऱ्या दिवशी दाभोळ मधील एका शाळेमध्ये इंटरव्यू साठी आला होता. तेव्हा तोही तरुण होता आणि मीही तरुण कुमारिका होते. परंतु कोणत्याही गोष्टीचा किंतु-परंतु मनात न आणता मी त्याला माझ्या घरी घेऊन आले. जेवण बनवून जेवायला देखील घातले. माझ्या घरामध्ये आश्रय दिला.

 तोही चांगलाच होता तो एकदाच भिंतीला चिटकुन तिकडे तोंड करून झोपला तर त्याने रात्रभर कुशी देखील वळवली नाही.

सकाळी उठून तो त्याच्या इंटरव्हूसाठी गेला त्याचे सिलेक्शन काही झाले नाही परंतु दाभोळ मधून गेल्यानंतर त्याने मला एक छान पत्र पाठवले त्याचा आशय असा होता

तुझ्यासारखी विलक्षण मुलगी मी आजपर्यंत पाहिले नाही. तु मनाने खूप साधी सरळ आणि भोळी आहेस. एखाद्या मुलाबद्दल काही देखील माहिती नसताना तू त्याला आश्रय दिला त्याची मदत केलीस याबद्दल धन्यवाद. अशा रीतीने खरोखरी मी एक आख्खी रात्र एका अनोळखी तरुणासोबत घालवली आहे


Rate this content
Log in