Jyoti gosavi

Others

4  

Jyoti gosavi

Others

अनोखे रक्षाबंधन

अनोखे रक्षाबंधन

3 mins
452


 खरेतर मला भाऊ नाही, त्यामुळे लहानपणी या सणा बद्दल काही वाटायचं पण नाही. कारण घरात वडिलांची बहीण येत नव्हती, आईचा भाऊ येत नव्हता. वडिलांची बहिण खूप लांब ,त्यामुळे येणे-जाणे नव्हते. आणि आईचा भाऊ मिलिटरी मॅन असल्यामुळे तो पण कधी प्रसंगी येत नव्हता. त्यामुळे या प्रसंगाचे काही सुखदुःख आम्हाला नव्हते.


 मोठ झाल्यानंतर थोड वाटायला लागलं, की इतरांच्या कशा बहिणी असतात, त्यांचे भाऊ येतात, किती प्रेमाने ओवाळतात ,आपल मात्र कोणीच कसं नाही? असं वाटू लागलं. आणि त्या त्या वयात, त्या त्या ठिकाणी भेटलेले भाऊ त्यांना 1/2 वर्ष रक्षाबंधन होत असे, नंतर तो विषय संपत असे. 


नंतर कोणा कडून कडून तरी समजलं की त्या भाऊ असून देखील पहिले राखी कृष्णाला देतात त्यानंतर मी देखील तशीच सुरुवात केली सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून पहिली राखी कृष्णाला आणि त्यानंतर देव्हाऱ्यातल्या सर्व देवांना देते आणि जशी द्रौपदीची पाठराखण केली तशीच माझी पाठराखण करत अशी प्रार्थना देखील करते


अनोखे रक्षाबंधन सुरू झालं मेंटल हॉस्पिटल ठाणे येथे, त्या हॉस्पिटलमध्ये वर्षभराचे सगळे सणवार साजरे केले जातात, कारण तेथे उपचारासाठी रुग्ण वर्षानुवर्षे असतात, त्यांना घरची उणीव भासू नये म्हणून, त्यामुळे सगळे सण साजरे केले जातात. 


लायन्स क्लब तर्फे दरवर्षी मनोरुग्णालयाच्या मनोरंजन कक्षामध्ये, हा सोहळा अगदी ठरलेला असायचा, त्याआधी रुग्णांकडून, त्या दिवसाला साजेशी गाणी, डान्स, आम्ही बसून घ्यायचो


" बहना ने भाई की कलाई मे प्यार बांधा है

 यासारख्या गाण्यावर देखील रुग्ण डान्स करायचे, आणि येणाऱ्या पाहुण्यांना स्री रुग्ण राख्या बांधायच्या. ओवाळायच्या,

 मग बरेच स्त्री रुग्ण ,पुरुष रुग्णांना राखी बांधायच्या.


पण पुष्कळ पुरुष रुग्णांचा असा हट्ट असायचा, तुम्ही सिस्टर आहे ना! मग तुम्ही आम्हाला राखी बांधायची. मग आम्ही देखील त्यांना राखी बांधायचो आणि काहीतरी खाऊ पण द्यायचो. 


आलेले पाहुणे पण चांगली ओवाळणी द्यायचे, त्या ओवाळण्याचे पैसे आम्ही ताब्यात घेऊन, नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा शेव बुंदी, बटाटेवडा, असा काहीतरी बाहेरून खाऊ आणून रुग्णांना वाटायचो. पण यापेक्षा अनोख दृश्य मी पुणे मेंटल हॉस्पिटल ला पाहिलं. 


तिथे वार्डा वॉर्डातल्या नर्सेस स्वतःच वर्गणी काढून, त्यातून रुग्णांना काहीतरी वॉर्डमध्ये बनवून वाटायच्या,आणि राखी देखील बांधायच्या, तिथे पुण्याला एक वर्षे हा उपक्रम मी देखील चालवला. 


मग असे अनोखे रक्षाबंधन करायला सुरुवात झाली, "दैनिक लोकमत" आपल्या राख्या सैनिकांना पोहोचवतात. फक्त त्यांच्या ऑफिसमध्ये आपण नेऊन द्यायच्या, आणि त्याबरोबर ती पत्र पण द्यायचं. लागोपाठ तीन वर्ष माझं पत्र लोकमत मध्ये छापून आल होत. आणि गेली पंधरा वर्षे झाले सैनिकांना राख्या पाठवण्याचा उपक्रम चालू आहे . 


एकदा मनात आलं ड्युटीवर च्या पोलिसांना कोण राख्या बांधील?  त्या वर्षी मी "तीन हात नाका " येथे जेवढे हवालदार ड्युटीवर होते, ट्राफिक पोलीस ड्युटीवर होते, त्या सर्वांना राख्या बांधल्या. आणि मिठाई पण नेली होती. मग ते विचारू लागले कुठल्या एनजीओ मार्फत आहे का? कोणत्या संस्थेमार्फत आहे का? म्हणजे आम्ही तसं पेपरला देऊ. 


त्यांना म्हटलं अहो! मला वाटलं मी घेऊन 🚶आले कोणती संस्था नाही, कोणता एनजीओ नाही, "ज्योती गोसावी" नावाची संस्था. त्यानंतर एक वर्षी झाडांना राख्या बांधण्याचा कार्यक्रम केला. एका संस्थेबरोबर जाऊन "झाडे वाचवा" मोहिमेमध्ये झाडांना देखील राख्या बांधल्या. 


आमचा लाडका "ब्रुनो" त्याला मुलांच्या मैत्रीणी येऊन राखी बांधतात. बाकी तर वाढदिवसाला, दिवाळीला ,मुलांना ओवाळते तशी त्यालादेखील

ओवाळते. अगदी रोज रामरक्षा म्हटल्यावरती, आमच्या आधी पहिला अंगारा त्याला लावला जातो. मग आम्ही असा अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी केलेला आहे.


Rate this content
Log in