अन्न हे पूर्णब्रह्म.(लघुकथा)
अन्न हे पूर्णब्रह्म.(लघुकथा)
"काय मग काय काय शिकवलं आज शाळेत?" शाळा सुटल्यावर सिमा आपली मुलगी मिनु ला घ्यायला आली होती.."आज पोएम शिकवली, टेव्टींवन नंबर शिकवला आणि टिफीन खायला बाहेर गार्डनमध्ये घेऊन गेल्या होत्या मिस." "अरे व्वा मस्त मग तु फिनीश केला का तुझा टिफीन?"
सिमा ने मिनुला विचारले." नाही थोडासा बाकी आहे." तेवढ्यात मिनुला आईस्क्रीमची गाडी दिसते ती पळतच जाते."मम्मी मला आईस्क्रीम खायचं आहे.घेऊन दे ना."
"आईस्क्रीम घेऊन देईल.पण आधी मला सांग त्या उरलेल्या टिफीन चं काय करणार तु? आईस्क्रीम खायला तुझ्या पोटात जागा आहे.मग टिफीन खायला का नाही."
मीनु आपला टिफीन काढते थोडासा उरलेला उपमा झाडाखाली टाकत असते. तेवढ्यात एक मुलगी पळतच येते"फेकु नका मला द्याना? मी कालपासून काही खाल्लं नाही भुक लागली आहे." मिनु आईकडे पाहते" बघितलं मिनु काहींना एवढं सुद्धा भेटत नाही खायला आणि तु ते टाकुन देत होती. काही कळलं का बेटा जेवणाचा अपमान नसतो करायचा, अन्न पुर्णब्रह्म असते हे पण शिकवतात ना शाळेत."
