Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Vasudha Naik

Others


3  

Vasudha Naik

Others


अमेरिका पर्यटन

अमेरिका पर्यटन

2 mins 227 2 mins 227

    दि.२ मे २०१९ साली मी एकटीच अमेरिकेला जाण्यासाठी निघाले.आजपर्यंतमी कुठेही जायच म्हटलं की मला बरोबर कोणतरी हवे असायचे.पण त्या वेळी कुठून बळ आले काय माहीत पण मी मुंबई ते पॅरीस असा प्रथम प्रवास केला. तिथे सहा तास हाॅल्ट होता.

   त्यानंतर पॅरीस ते डेट्राॅईट पर्यंतचा प्रवास होता. एकटीने प्रवास केला जरा अशांत मन होते,चलबीचलचालू होती.

   पण एकदाची मी पोहोचले. माझी जावू,दीर मला न्यायला होते. जावूबाई ही मावस बहीणच आहे. एअरपोर्टवर अक्षरशः तिने घट्ट मीठी मारली व आश्रूंना मोकळी वाट करून दिली. माझेही हेच झाले होते.

   नंतर गेलो घरी.बाहेर पाहताना नयनी दृश्ये साठवतच होते. घरी माझ्या स्वागताला पती,मावस भाऊ ,भावजय,भाचा सारे दारात आले होते.तो क्षण जीवनी विसरणे शक्यच नाही.सांगायचे हे की अशी मी तिथपर्यंत छान पोहोचले.

   दि.१४ मे २०१९ ला आम्ही नायगरा फाॅल हे जगातील एक आश्चर्य पाहण्यासाठी बाहेर पडलो.

    दुतर्फा गर्द,उंचचच झाडी,हिरवाईने नटलेली होती.रस्ते सहा,सात ,आठ,अगदी बारा पदरी पण होते.स्वच्छ निळे आकाश हे दृश्य डोळे भरून पाहत होते.

   एकदाचे हवे ते ठिकाण आले आणि समोरचे देखणे पथ्वीवरील आश्चर्य पाहताना मन हर्षात सजत होते.कॅनडाच्या बाजूने दिसणारा फाॅल,अमेरिकेच्या बाजूने दिसणारा फाॅल खूप मनमोहक दृश्य नयनी भरून घेत होते.अंगावर येणार्‍या तुषारांचे स्वागत करून आनंद घेत होते. पाण्याचा वरून येणारा फ्लो काय वर्णन करू त्याचे लयययय भारीरीरीरी....एवढेच म्हणेन...

दीर,जावू माझा हा आनंद पाहत होते.खूश झाले होते.भाऊ,भावजय पण सर्वांसमवेत आनंद घेत होते.

   सकाळी,दुपारी व रात्री तिन्ही वेळचे नायगराचे रम्य रूप पाहिले.

  रात्री नायगरावर "फायर शो"

होतो.आपण दिवाळीत जसे फटाक्यांची सुरेख दृश्ये पाहतो त्या पेक्षा कैकपटीने आसमंत उजळून निघत होता. पाण्याचे इंद्रधनूषी रंग मनमोहक होते.

   पाहत होते जगातील आश्चर्य

   अनुभवत होते,नयनी साठवत होते...

   असा हा अमेरिकेतील एक सुखद पर्यचनाचा अनुभव....


Rate this content
Log in