अलक
अलक
1 min
109
एका गावात एक उदार मनाचं दांपत्य राहत असे.त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती.गावच्या सरपंचाला त्यांचं मोठेपण बघवत नव्हतं.लोक सरपंचाला नमस्कार न घालता सुखी कुटुंबाला नमस्कार घालून मानत होते.एक दिवस अचानक सरपंचाच्या घरी चोरी झाली...होतं नव्हतं गेलं.सरपंच त्या उदार मनाच्या दांपत्याकडे मदतीसाठी गेले.मोठ्या मनाच्या माणसांनी सरपंचाला आर्थिक मदत केली.व धैर्य दिले.तेव्हा सरपंच स्वत:च्याच नजरेत पडला होता...
