आवडते ठिकाण भुशी डॅम
आवडते ठिकाण भुशी डॅम
आम्ही नेहमीच भेट देतो ते स्थळ आहे लोणावळा खंडाळा. दर पावसाळ्यामध्ये आमच्या दोघांची तर एक पावसाळी पिकनिक असते. त्यामध्ये भुशी डॅम ला जाणे कंपल्सरी असते. आज पर्यंत भुशी डॅम सारखा नैसर्गिक तरीही सुरक्षित असाच पॉट स्पाॅट पाहिलेला नाही .
ती जागा मिलिट्रीच्या ताब्यात आहे. पायऱ्या पायऱ्यांवरून वाहणारे डॅमचे पाणी नजरेला देखील सुखावते शिवाय त्याच्यावर सुरक्षितपणे बसता येते पाण्यातच बसून गरम-गरम वडापाव चहा भुट्टा याचा आस्वाद घेता येतो. फेरीवाले आपल्याला जागेवरच आणून देतात. शिवाय इतर छोट्या-मोठ्या पावसाळी वस्तू तेथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कपडे बदलण्यासाठी पैसे देऊन का होईना पण सोय आहे. क्षणात पाऊस क्षणात धुके असे सुंदर वातावरण तेथे असते शिवाय मुंबईपासून जवळ आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी लोणावळा येथील भुशी डॅम मला भेट देतोच.