आवडता पदार्थ
आवडता पदार्थ
मला कोणताही गोड पदार्थ आवडतो. त्यातल्या त्यात आवडता म्हणजे काजू कतली आणि आमरस पुरी. आमरस हा प्रकार मला पृथ्वीवरील अमृत वाटतो .जगात अशी कोणतीच व्यक्ती नसेल जिला आमरस आवडत नाही
लहानपणी घरचेच आंबे असल्याकारणाने अगदी सगळे कपडे, नाक तोंड भरेपर्यंत मी आंबा खात असे. त्या दिवसात जेवण हा प्रकार माहितच नव्हता . आई सकाळी सकाळी आंब्याची आढी उघडायची, आणि त्यातील थोडेसे लागलेले खराब असे आंबे एक मोठा घमेल भरून निघायचे म्हणजे साधारण चाळीस-पन्नास आंबे रोजचे खराब निघायचे मग वडील कैरी कापण्याची विळी घेऊन बसायचे. व त्यातील चांगला चांगला भाग आम्हाला कापून घ्यायचे व त्यातच आम्हा भावंडांचे पोट भरायचे. एकदा माझी आई अक्षयतृतीयेला माहेरी होती. त्यामुळे पुरणाची पोळी घरामध्ये होणार नव्हती ,पण माझ्या वडिलांनी आमरस पुरी, भजी ,बटाट्याची भाजी चटणी ,कोशिंबीर पुर्या इतका ताट भरून मेनू केला कि त्यातच आम्ही एकदम तृप्त झालो त्यादिवशी आई घरात नाही याची काही कमतरता वाटली नाही