Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Jyoti gosavi

Others


2  

Jyoti gosavi

Others


आठवणीतला श्रावण

आठवणीतला श्रावण

2 mins 46 2 mins 46

लग्नानंतरचे पहिलेच वर्ष, दिवस अजून नव्या नवलाईचे होते. अजून एकमेकांना चोरटे कटाक्ष, गालातच स्मित आणि संधी मिळताच निसटते स्पर्श याचे होते.


श्रावणातली दुसरी मंगळागौर सासरी करायचे ठरवले. खरे तर घर छोटेसे चाळीतले होते. पण सासूबाईंना आणि मला सगळ्या गोष्टींची हौस फार आणि त्यांचे मनही मोठे होते. समोरची एक खोली वापरण्यासाठी तात्पुरती मागून घेतली. पूजेची सर्व तयारी केली, मंगळागौरीला लागणारी पत्री, फुले, चौरंग, पूजनाचे सर्व सामान तयारी केली. वाळू आणून शंकराची पिंड तयार केली. स्वयंपाकालादेखील एक बाई सांगितल्या. किमान 25 माणसांचे जेवण त्यांनी तयार केले. समोरची खोली जेवणाला व नंतर मंगळागौरीचे खेळ खेळायला होईल, असा विचार केला व आमच्या खोलीत गौरीपूजनाची तयारी केली. मंगळागौर पूजनासाठी लागणाऱ्या पाच जणी आधीच आमंत्रित करून ठेवल्या होत्या पण...?


आणि हा पणच मोठा उभा राहिला. त्यादिवशी उजाडल्यापासून पावसाने संततधार लावून धरली. नुसते धोपटायला सुरुवात केली, त्यातून तो मुंबईतला पाऊस मग काय विचारता तास दीड तासात रस्त्यावर पाणी. नाले भरून वाहू लागले ट्रॅफिक धीमी झाली आणि लोकल बंद पडल्या. आता करायचे काय... त्यातून स्वयंपाकाच्या मावशींनी सकाळी लवकर येऊन स्वयंपाक तयार करून ठेवला. बारा वाजले, एक वाजला, कोणाचाच पत्ता नाही. नंतर सासुबाई बोलल्या आता तुम्ही दोघे मिळून मंगळागौरीचे पूजन करा. तिला तुमच्या दोघांच्या हातूनच पूजा पाहिजे म्हणून कोणी आले नाही. मग सासूबाईंच्या आज्ञेने आम्ही दोघांनी मिळून मंगळागौर पूजन केले.


मी एक उखाणा पण घेतला व सासूबाईंच्या आज्ञेनेच आम्ही दोघांनी एक फुगडी पण खेळली.

नैवेद्य दाखवून आरती केली व घरोघरी चाळीमध्ये प्रसादाचे ताट वाढून दिले, नंतर अशा धो धो पावसात पण उरलेले अन्न एका बेघर वस्तीत नेऊन दिले.


अशी माझी पहिलीवहिली मंगळागौर व तो पहिला श्रावण कायमचा आठवणीत राहिला आहे.


Rate this content
Log in