आठवणी
आठवणी
आठवणी, मनाच्या तळाशी वारुळात दडपलेल्या मुंग्याच जणू.
एक बाहेर आली की सर्वजणी पटपट बाहेर येऊ लागतात.
आठवणी पुस्तकात जपलेल्या अलवार मोरपिसा सारख्या,
हळुवार गालावरून फिरवल्या की अजून छान वाटतात.
आठवणी एखाद्या डायरीत
किंवा ग्रीटींग मध्ये असलेल्या सुकलेल्या गुलाब पाकळ्या जणू,
अजूनही सुगंध देणाऱ्या
आठवणी कधी सुखाच्या कधी दुःखाच्या कधी कडू तर कधी गोड मनाच्या संदुकीत जपलेले सुगंधी क्षण
आठवणी वारुळात लपलेल्या विषारी नागासारख्या, मोका येताच डसणाऱ्या
आठवणी काटेरी झुडपा सारख्या
ओरबाडून रक्तबंबाळ करणाऱ्या
पण शेवटी त्या आठवणीच कधीही विसरता न येणाऱ्या आणि कोणाला न देता येणाऱ्या आपल्या आपणच आठवायच्या कधी हसायचं खुदकन,
तर कधी दोन टीपे गाळायची आणि ठेवून द्यायच्या परत बंद करून मनाच्या तळाशी बंदिस्त कडी कुलपात
जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत त्या तुम्हाला साथ करतात
अशा या कडू-गोड आठवणी आठवणी आणि फक्त आठवणी