आठवणी
आठवणी


आज एक मे कामगार दिन. आजच्या तारखेला अठरा वर्षांपूर्वी माझ्या मुलांच्या मुंजी केल्या. सार्वजनिकच केल्या तरी पण थाटात केल्या नुसत्या सार्वजनिक मुंजीसाठी पण मला दहा एक हजाराचा खर्च आला होता. तेव्हा माझे आई-वडील होते. वडील आजारी होते पण मुंजीसाठी आले होते. घरासमोरच रस्त्यावरचे काम चालू असल्याने धुळीच्या ऍलर्जीमुळे मीच खूप आजारी पडले होते. अगदी पुण्याहवाचन बसता येईल की नाही असे मला वाटत होते. दोन्ही मुलांच्या मुंजी बरोबर केल्या असल्याने एकाला पुण्याहवाचन मी बसले व छोट्या मुलांना माझा दीर आणि छोटी जाऊ बसले. त्यावेळी स्वतःची कार नव्हती. भाड्याने कार हायर केली. त्यातून मुलांची वरात काढली. आज ते जुने फोटो काढले असता खूप आठवणी जाग्या झाल्या.