STORYMIRROR

komal Dagade.

Others

3  

komal Dagade.

Others

#आठवण साडीची....

#आठवण साडीची....

3 mins
303

           रेश्माची आई खूप वर्षांनी रेशमाकडे राहायला आली होती. तेही रेश्माच्या हट्टापोटीच आली होती. तिची तक्रार होती. आई माझ्याकडे अजिबात येत नाही. मुलगी सासरी गेल्यावर आईने येऊ नाही का....? तिच्या घरी...?.रेश्माच्या खूप आग्रहानंतर आई तिच्याकडे चार दिवसासाठी आली होती. तो दिवस आईचा आरामात गेला. भरपूर मुलीच्या आणि आईच्या गप्पा झाल्या. रेश्माची सासूबाई खूप प्रेमळ स्वभावाची होती.


           दुसऱ्या दिवशी साड्याच्या खरेदीसाठी दोघी गेल्या होत्या. दुकानात खूप छान छान साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. रेश्माला कितीही साड्या घेतल्या तरीही मोह काही आवरतच नव्हता. आईलाही तिने तिच्या आवडीची साडी घेतली होती. दोघीही आता बिल पेड करण्यासाठी गेल्या. बिल भरून झालं की दोघीही बाहेर पडनारच तेव्हा रेश्मा च लक्ष खूप मोहक अश्या डिजायनर साडीवर गेले. तिला तीही साडी खूप घ्यावीशी वाटली, पण आधीच खूप साड्या घेऊन झाल्या असल्याने तिने मोह आवरला. आईने तिच्या नजरेत भरलेली साडी ओळखली होती. ती मात्र त्यावेळेस काहीच बोलली नाही.


रेश्माच्या आईचे चार दिवस कसे गेले कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या निघणार होत्या. रेश्मा आईला खूप आग्रह राहण्यासाठी करत होती, पण आईचं मत होतं पाहुण्यांच्या घरी जास्त दिवस राहू नये. रेश्माने आईची चांगली उठबस केली. आईलाही खूप कौतुकं होतं मुलीचं. सासुसासरे, मुलं, नवरा यांना रेश्मा छान जपत होती. त्यांची काळजी घेत होती. याचं आईला तिच्या कौतुकचं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रेश्माची आई नागपूरला निघून गेल्या. रेश्मा चांगलीच कुटुंबात गुंतली होती. मुलांनाचा अभ्यास, शाळा, सासु-सास ऱ्यांचे जेवण नाष्टा, नवऱ्याचा टिफिन घरातील कामात रेश्माचा वेळ गेलेला कळतच नव्हतं .

          आज आईला नागपूरला जाऊन एक महिना होतं आला होता,पण आईला फोन करनेही रेश्माला झालं नाही.


एक दिवस आईचाच न राहून फोन आला रेश्मा अग किती व्यस्त आहेस...? आईची आठवणही नाही तुला...? आईचं बोलणं ऐकून घरातील झालेल्या कुरबुरीत रेश्माने आईवर राग काढत बोलली,आई तू तरी समजून घेत जा ना मला ...! सासरचे नाही समजून घेत. माहेरकडील लोकांनी तरी समजून घेतलं पाहिजे. रेश्मा जरा चिडूनच बोलली. इकडे घर, मुलांना सांभाळताना नाही ग लक्षात आलं. आईला रेशमाचं बोलणं जरा मनाला लागलं ....! धावपळीत विसरली मी कॉल करायचा.


रेश्मा," आई तू कॉल का केला होतास ...?


आईने राग व्यक्त न करता...! अग मुलीला कॉल करायला कारणच लागतं का.....?मुलीच्या चौकशीसाठी करू शकते आई कॉल....!.


"अग तुझ्या आत्याच्या मुलीचं लग्न ठरलंय, आणि आत्यानी चार दिवस आधी तुला बोलवलय इकडे...? आई चार दिवस आधी नाही जमणार ग..! कारण घरात माझी खूप गरज आहे. मा

झ्या शिवाय इथं काहीच होऊ शकत नाही. बरं तुला जमलं तर ये नाहीतर राहूदे...! बरं चल मी ठेवते. आईने फोन ठेवून दिला. रेश्माला आईशी ओरडून बोलल्याच रेश्माला वाईट वाटलं होतं. आईलानेही तिला चार दिवस आराम भेटावा म्हणूनच चार दिवस आधी तिला बोलवलं होतं . हे रेश्माने ओळखलं होतं. आई काळजीपोटीच बोलत होती. विनाकारण आईवर चिडल्याचा तिला त्रास होतं होता.


रात्री अनिकेतला लग्नाविषयीं सांगितलं. त्याने तर लगेच तीला परमिशन देऊन टाकली. कारण मुलांचीही परीक्षा पुन्हा जवळ येतील त्यामुळे तुला कोठे जाता येणार नाही. त्यामुळे आहे वेळ तर ये जाऊन....! मी इकडे बघेन.....

मुलांनाही तेवढेच बरं वाटेल बाहेर गेल्यावर. तू काळजी करू नकोस. आता रेश्माला आईला रागवून आणि नकाराथी बोलण्याचा पच्छाताप झाला होता. तिला आईची काळजी दिसून आली होती.


दोन दिवसांनी ती आत्याकडे गेली. आईपण तिथेच होती. पोरीची वाट चातकासारखी पाहत होती. तिला पाहून आईच्या डोळ्यात पाणी आलं. आईने लगेच तिला जेवण करून आराम करायला सांगितला. संद्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता ..! आणि अशीही म्हणाली मुलांना मी सांभाळते. तू काळजी करू नकोस. आईच्या बोलण्याने तिला खूप भरून आलं. आईची काळजी पाहून आईच्या गळ्यात पडली. ती तिथून आराम करायला निघून गेली.


संध्याकाळी आई रेश्माच्या हातात एक गच्च भरलेली पिशवी देत होती. "अग हे बघ तुझ्यासाठी सामान घेऊन आले, तिने उघडून पाहिले तर त्यामध्ये तिच्या आवडीचे गुलाबजाम, मिठाई, आईने हाताने बनवलेले लोणचे, आणि एक बॉक्स ही होता. तो बॉक्स तिने उघडून पहायला तर तिला खूप आनंद वाटला . कारण त्या बॉक्स मध्ये दोघीनी मिळून पाहिलेली साडी होती, तीच ती जी लाल डिझाईनर साडी तिला आवडलेली . रेश्माला खूप आनंद वाटला. आईने किती लक्षात ठेवली होती तिची आवड, आणि ती आईशी नीट बोलली ही नव्हती. घरचा राग तिने आईवर काढला होता.


खरंच आहे ना...! आई मुलांच्या आनंदासाठी किती काही करत असते, पण तिला फक्त अपेक्षा असते, मुलांचे दोन शब्द प्रेमाचे ऐकण्यासाठी ....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन