Lata Rathi

Others

2  

Lata Rathi

Others

आत्मसन्मान--भाग-पहिला

आत्मसन्मान--भाग-पहिला

3 mins
592


भाग-पहिला

----------------------------

माझी ही कथा ,मोठी असल्यामुळे तीन भागात विभाजित केली आहे.

आजच्या आठवड्याचा पहिला भाग....

--------------------------

यश चा आज दहावीचा निकाल लागलाय. महाराष्ट्रात तो प्रथम आलाय.

पत्रकार घरी आलेत, फोटो काढताहेत….

जुई…यश ची आई, आजी त्याला पेढा भरवतेय…

आणि…,नकळतच तिचे डोळे पाणावले…तीच लक्ष भिंतीवरच्या जयेश च्या फोटोकडे जातं…. जणू तो हसतोय आणि म्हणतोय

” वेडाबाई रडतेस काय!!!

मी शरीराने जरी तुमच्या सोबत नसलो, तर काय झालं…. मी अजूनही तुझ्या पाठीशी आहे…

आपला यश नक्कीच मोठा ऑफिसर बनेल….

————————————

माझ्या कथेची नायिका-जुई…

दोनच वर्ष झालेत लग्नाला, तिचा नवरा जयेश… कॉलेज मध्ये contribution basis वर अस्थायी स्वरूपात कामाला होता.

जुई आणि जयेश यांचा तसा प्रेमविवाह. पण घरच्यांच्या संमतीने झालेला.

————————————

जुई तिची लहान बहीण सई, आई बाबा असं चौकोनी कुटुंब. घरी खूप सधनता. कशाचीच म्हणून कमतरता नाही. तिचे बाबा बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत, तर आई एका नामांकित शाळेत मुख्याध्यापिका.

मुलगा नाही म्हणून त्यांना कधीच त्याची खंत वाटली नाहीं. मुलींनाच त्यांनी मुलांसारखी वागणूक देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याची त्यांची धडपड.उत्तम संस्कार, वागण्यात मोकळीकता, सर्व स्वातंत्र्य दिलं मुलींना.

पण नशिबाने जे पुढ्यात वाढून ठेवलेलं असतं त्याचा स्वीकार करावाच लागतो.

तर झालं असं….

जुई ने नुकतंच msc. b.ed. Complete केलेलं…आणि ती फक्त अनुभव म्हणून कॉलेज मध्ये contribution बेसिस वर शिकवायला जायची.

तशी तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरू होतीच.

आज ती आपली scooty घेऊन कॉलेज ला जात होती, मधेच तिची scooty बंद पडली….तिने खूप प्रयत्न केला सुरू करायचा….पण सर्व व्यर्थ…

जयेश पण आपल्या मित्रासोबत तिकडेच जात होता, त्यानं जुई ला असं रस्त्यावर उभं बघितलं…. आणि काही मदत करता येईल का म्हनून तिला विचारलं…

“मी आपणास काही मदत करु शकतो का??

जुई ने त्याच्याकडे पाहिलं….तेवढ्यात जयेश ने गाडीचा ताबा घेतला…

त्याने गाडी सुरू करायचा प्रयत्न केला.. पण ती सुरूच होईना…

जयेश- मॅडम… बहुदा कार्बन पकडलाय…. आपण असं करूया, जवळच एक garrage आहे, तिथे गाडी नेऊया…असं म्हणतच त्याने गाडी नेली.आणि तीही निघाली त्याच्या पाठोपाठ…

मनात भीतीच काहूर माजलेलं….कोण हा??? कुठला… आपण याच्यावर एवढा विश्वास तर ठेवतोय…पण हा कुठे नेत तर नसेल ना आपल्याला….

एवढ्यात गॅरेज आलं, त्याने तिची scooty उभी केली, कामगाराने गाडी चेक केली, आणि दुरुस्त करून दिली….

तेवढ्या वेळात तिने आपल्या आईबाबांना याची कल्पना दिली.

जुई ने जयेश चे आभार मानले….आणि ती गाडी घेऊन कॉलेज ला गेली.

दुपारी लंच टाईम च्या ब्रेक मध्ये जुई आपल्या सहकारी मैत्रिणीसोबत कॅन्टीन मध्ये बसली असतांना तिला जयेश काही सहकारी अधिव्याख्यातासोबत दिसला. तो आजच तासिका तत्वावर रुजू झाला होता. तिची अन त्याची नजरानजर झाली…दोघांनीही स्मित हास्य केलं.

एकाच कॉलेज मध्ये म्हटल्यानंतर त्या दोघांच्या वारंवार भेटीगाठी होऊ लागल्या. ते दोघेही चांगले मित्र झाले, त्याचा प्रत्येक गोष्टीत मदत करण्याचा स्वभाव तिला खूप भावला. दोघांचे विचारही खूप मिळते-जुळते…एकमेकांना जपनारे. आता मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं….

घरच्यांच्या कानावर तसं गेलं होतंच हे प्रकरण….

पण इथे एक अडचण आली जुई जितक्या सधन घरची, त्याच्याच विपरीत जयेशची घरची परिस्थिती…जयेश घरात सर्वात मोठा.आई बाबा आणि त्याच्यापेक्षा लहान भाऊ. घरी फक्त सहा एकर शेती, त्यावरच सर्व निर्वाह चालायचा.

जयेश फावल्या वेळात शिकवणी वर्ग घ्यायचा.

जुई- जयेश, ऐक ना…माझ्या घरचे माझ्या लग्नासाठी मुलं बघताहेत…. काय ठरवलं तू!!!

जयेश- जुई, हे बघ…आपलं लग्न possible नाही गं…

मी तुला सुखी नाही ठेवू शकणार…please… मला समजून घे.

पण जुई हट्टालाच पेटलेली…

मी राहीन रे तुझ्याबरोबर सुखाने…नको रे मला असं दूर करू…

काही—काही मागणार नाही मी तुला…. please…

पण म्हणतात ना “प्रेम आंधळं असतं”

जुई ने आपल्या घरी सर्व सांगितलं…तिचे आईबाबा तयारच नव्हते…पण रागाच्या भरात मुलीने वाईट पाऊल उचलल्या पेक्षा लग्न करून देणे कधीही चांगलं….जयेश च्या घरचे पण तयार झाले…

काही निवडक पाहुण्यांच्या मदतीने एकदम साध्या पद्धतीने लग्न झालं.


पुढील भाग पुढच्या सोमवारी


माझी कथा आवडल्यास नक्कीच मला कळवा

आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत


Rate this content
Log in