शब्दसखी सुनिता

Children Stories Inspirational

4  

शब्दसखी सुनिता

Children Stories Inspirational

आत्मनिर्भर

आत्मनिर्भर

3 mins
215


अस्मिता आणि सुजय हे दोघेही आपल्या मुलांसोबत खुप आनंदात राहत होते. मुलगा  आकाश आणि मुलगी संध्या अस छोटस  परिवार होता त्यांचा, आपल्या दोन्ही मुलांनी खुप शिकाव मोठ अस सुजयच स्पप्न होत.

तो एका प्रायव्हेट जाॅब करत होता. पण आपल्या परिवाराला आणि मुलांना काही कमी पडू देत नव्हता. अस्मिता ही सुजयला आपल्या संसाराला हातभार लावायची. ती शिवणकाम करायची. आकाश नववीत शिकत होता तर संध्या पाचवीत होती. दोघेही बहीण भाऊ शाळेत हुशार होते. त्यामुळे सुजयला आपल्या

मुलांचा खुप अभिमान वाटे. अस्मिता आपल्या घरचही सगळ करत असते. खुप मेहनती असते. पण कोरोनामुळे जाॅबसाठी बाहेर जाणार्‍या सुजयला काळजी घेऊनही कोरोनाची लागण झाली. त्याची तब्येत खुपच बिघडली. त्याला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल. पण सुजयची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आणि तो कोरोनामुळे दगावला.

एका दिवसात सगळ होत्याच नव्हत झाल. करोनाने सुजयच हसत खेळत घर पार कोलमडून गेल. त्याच्या जाण्याने बायको आणि मुले एकटी पडली. खुप रडत होती. कोरोनाने सगळच हिरावून घेतल होत. सुजयशिवाय आयुष्य कस जगायच हा प्रश्न अस्मिताला पडला, संसार आणि मुलांची जबाबदारी कशी पार पाडायची, त्यात हा  दुःखाचा डोंगर कोसळलेला यातुन कस बाहेर पडाव, कसा मार्ग काढावा तिला काही समजत नव्हत. तेव्हा आकाशने आपल्या आईला  सांगितल की " आई तु अशी खचुन जाऊ नको ग, तुझ्याशिवाय आता आम्हांला कोण आहे ग ? बाबाही सोडून गेले. तो रडायला लागला त्याच बघुन लहान असणारी संध्याही रडायला लागली. अस्मिताने दोन्ही मुलांना जवळ घेतल आणि तिने ठरवल की सुजयच स्वप्न होत की " मुलांना कधीही काही कमी पडू देत नव्हते आणि आपल्या मुलांनी शिकुन खुप मोठ व्हाव हे त्यांच स्वप्न मी पूर्ण करेन " म्हणून तिने  आपले डोळे पुसले. त्या दिवशी तिला आकाशच्या शब्दांनी आधार मिळाला. त्यादिवशी पासुन ती पुन्हा उभी राहीली आपल्या लेकरांसाठी. तिने पुन्हा शिकवकाम सुरू केल.


  मुलांच्या शाळेच्या फीसाठी आणि कुटुंबाचा खर्च त्या कमाईतु भागत नव्हता. तेव्हा आकाशला सगळ समजत होत. परिस्थितीची जाणीव होती. तो खुप समजदार झाला होता. खुप कठीण परिस्थितीतुन ते जात होते. तेव्हा 

आकाशने घरपोहच भाजीपाला पोहचवण्याच काम सुरू केल. कोरोना होता तरिही तो सगळी काळजी घेऊन हे काम करत होता. घरपोहच सामान मिळेल, कोरोनामुळे आपल्याला 

कुठेही बाहेर जायची गरज नाही पडणार म्हणून इजुबाजुच्या सोसायट्या मधले लोक त्याला

भाजीपाला आणुन द्यायला सांगु लागले. त्याला खुप ऑर्डर्स मिळत होत्या. हळूहळू त्याचा हा व्यवसाय वाढत होता. तो सगळ मॅनेज करायचा. तो हे काम प्रामाणिकपणे करायचा. कष्ट करायची तयारी तर होतीच

म्हणुन तो आपल्या आईला मदत करू लागला. त्याच सगळछान सुरू होत. त्याच्या शाळेतील मित्रांनी ही गोष्ट बघितली आणि त्यांनी त्याला पैशाची मदत करायची ठरवली आणि त्याला तु अभ्यास कर हे असल काम आताच करू नको अस सांगितल. तेव्हा आकाशने त्याला म्हटल, की मित्रांनो, " मी आज तुमचे पैसे

घेतले तर मला तिच सवय लागली आणि कुठलही काम वाईट नसतात. " तुम्हांला मला

मदत करायची असेल तर फक्त माझी साथ द्या बाकीच मला काही नको " त्याच्या मित्रांना त्यांची चुक कळतात. ते आकाशला साॅरी म्हणतात. त्याचा समजदारी बघून आईलाही त्याचा अभिमान वाटतो. तिच्या

डोळ्यांत चटकन् पाणी येत आणि ती त्याला जवळ घेऊन विचारते, " काय रे कधी इतका मोठा झालास, एवढ सगळ करत आहेस तु ." तो सांगतो की माझ्या बाबांनी मला लाचारीने नाही तर आत्मनिर्भर होऊन जगायला 

शिकवल आहे. 


Rate this content
Log in