आपण नेहमीच चांगले वागावे....
आपण नेहमीच चांगले वागावे....


सध्या पितॄपक्ष त्यामुळे कावळेदादांची मस्त चंगळ होती...
रोज खीर-पुरी,मस्त मस्त पदार्थ,काऊची पिले रोज स्टेटस अपडेट करत होते..
चिऊ-चिमणा यांची तब्येत बिघडली होती,त्यात खूप ऊन, चिऊची बाळ अगदी मऊभात खावून कंटाळली होती..
रोज असे फोटो बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटत होते..एवढूसा चेहरा करून बसली बिचारी...
शेजारच्या खिडकीतून काऊ बघत होता,त्याला दया आली, त्याने भरपूर खीर आणली आणि चिऊच्याबाळांना दिली. त्याच्या बाळांना मात्र राग आला..कशाला दिली खीर? चिऊ कशी वागली होती तुमच्यासोबत? त्यावर काऊने समजावून सांगितलं,कोणी कसेही वागले तरी आपण नेहमीं चांगले वागावे, "कोणी कितीही काटे पसरले तरी आपण नेहमीच फुले पसरावी" कोणाच्या जखमेवर कधीच मीठ चोळू नये,उलट मायेने फुंकर मारावी...
काऊची पिल्ले हसली,त्यांना मनोमन पटले होते.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्या अंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.