Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

आपली अंधश्रद्धा

आपली अंधश्रद्धा

2 mins
1.2K


आजचा विषय अंधश्रद्धा


जत्रा मे फथरा बिठाया

तिरथ बनाया पानी

दुनिया भाई दिवानी

पैसे की धूलधानी

किंवा

देव देव कोणास म्हणावे

वर्म कळेना गुरुकिल्ली

खरे देव राहिले बाजूला

यांनी फुकट जनता नागवली

मी म्हणते श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात चार बोटाचे अंतर असते डोळ्याने पाहतो ती श्रद्धा व कानांनी ऐकतो ती अंधश्रद्धा शिवाय कोणाची श्रद्धा ही दुसऱ्याची अंधश्रद्धा असू शकते किंवा दुसऱ्याची अंधश्रद्धा ही कोणाची श्रद्धा असू शकते

खरेखोटे, द्वैत अद्वैत, श्रद्धा अंधश्रद्धा यांच्यामध्ये एक धुसर सीमारेषा असते बराच वेळा त्यांची सरमिसळ होते किंवा गल्लत होते

कोठेतरी कोणा आदिवासींनी दिलेला नरबळी किंवा प्राण्यांचा बळी ही त्यांच्यासाठी श्रद्धा असते कारण लहानपणापासून त्यांनी तेच पाहिलेले असते त्यांना कुठले कायदेकानून माहीत नसतात कधीकधी कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडते एखादी रूढी त्यांनी मोडावी नेमके त्याच वेळी एखादे अघटित घडावे किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती यावी अशा वेळी त्यांचा अंधश्रद्धेवर पक्का विश्वास बसतो पण आपल्यासाठी मात्र ही अंधश्रद्धा असते

पण म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन सारख्या समितीने त्याचे टोकच गाठले आहे तुम्ही करता तो देवधर्म ,कुळधर्म, कुळाचार ,सणवार, देवांची पूजा ,तीर्थाटन हे सारेच त्यांच्या दृष्टीने अंधश्रद्धा ते पण चूक आहे अति टोकाला जाणे ती पण अंधश्रद्धा आहे आयुष्य काय फक्त खाणेपिणे व मजा करणे यासाठीच दिलेले आहे का साऱ्याच गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येत नाही देव दिसत नाही म्हणून ती अंधश्रद्धा , मग हवा तरी कोठे दिसते? पण ती जाणवते ना तुम्ही मग तीचे अस्तीत्व मान्य करता ना? मग देवाचे का नाही? नाहीतरी सृष्टीची निर्मिती चराचराचे व्यापकता यातले जीवजंतू प्राणी या सार्‍यांची निर्मिती हेच एक मोठं कोड आहे त्याचे उत्तर विज्ञानाकडे नाही.

शेवटी श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही ज्याच्या-त्याच्या मान्यवर आहे. कोंबडी बकरी किंवा इतर प्राणी देवाला बळी देणे हि अंधश्रद्धा तसेच एखाद्या जीवाला हलाल करून मारणे, ही देखील अंधश्रद्धाच. देवाच्या नावाखाली देहाला कष्ट विणे काटे टोचून घेणे, त्वचा अर्पण करणे, विस्तवातून चालणे ही अंधश्रद्धा तसेच हसन हुसेन बोलत फासळ्या तुटेपर्यंत व रक्त येईपर्यंत छाती बडवणे हीदेखील अंधश्रद्धाच आहे.

एक गोष्ट मात्र नक्कीच म्हणावी लागेल या सृष्टीला कंट्रोल करणारी किंवा सृष्टीचा कारभार चालविणारी एक अज्ञात शक्ती आहे तिला तुम्ही ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, किंवा येशू म्हणा जशी चांगली शक्ती असते तसेच वाईट शक्ती देखील असते.

सुष्ट-दुष्ट, काळा-पांढरा, भूत पिशाच्च, देव या नाण्याच्या दोन बाजू आहेत या चांगल्या वाईटाच्या तराजू वरच नीतिमत्ता तोललेली आहे.

भूत प्रेत पिशाच्च हडळ आत्मा नजर लागणे करणी करणे हे सारे दिसत नसले तरी आहे परंतु त्याच्या नावाखाली मांत्रिक बंगाली बाबा जादूटोणा वाले सामान्य जनतेचा गैरफायदा घेतात या वाईट शक्तीच्या पारिपत्याच्या नावाखाली लोकांकडून लाखो रुपये उकळतात स्त्रियांचा गैरफायदा घेतात हे सारे गैर आहे त्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे

जीवनात चढ-उतार हे येतच असतात जर तुमची देवाप्रती श्रद्धा असेल, तर तो परमेश्वर तुमच्या प्रतिकूल परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभा राहतो. यासाठी कोणा बापू, बाबांच्या नादी लागू नका. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी तुम्हाला तारून नेतील


Rate this content
Log in