आनंदाचे छोटे हसरे क्षण
आनंदाचे छोटे हसरे क्षण
रेवाच्या मोबाईलचा गजर वाजला तशी ती ताडकन उठली..आज एक अत्यंत महत्वाची मीटिंग असल्याने तिला ऑफिसला नेहमीपेक्षा जरा लवकरच पोचायचे होते. उठून पटकन चहा केला, एकीकडे किचन मध्ये काम करता करता कसाबसा तिने चहा प्यायला..पटकन आंघोळ आटोपून सलील ला उठवले..तिची ती धावपळ पाहून सलील ने ओळखले की बाईसाहेब आज ऑफिसला लवकर निघणार..मुलांचे कॉलेज उशिरा असल्याने मुले आरामात झोपली होती. सलीलला चहा देऊन ती लगेच तयार होऊन ऑफिसला निघाली..
संध्याकाळी घरी यायला पण तिला आज उशीरच झाला होता. ती घरी येताच मुग्धाने जाहीर केले की हा new year सर्वांनी गोव्याला सेलिब्रेट करायचा. डिसेंबर महिना लागला की मुलांना फिरायला जायचे वेध लागायचे...पण यावेळी मुग्धाला ऑफिस च्या कामाने अजिबात कुठेही जायला फुरसत नव्हती..त्यामुळे तिने यावर्षी यायला साफ नकार दिला..हवं तर तुम्ही जाऊन या अस ही suggest केलं..ते ऐकून सिद आणि मुग्धा जरा वैतागले.."हे काय आई, तुला ऑफिसपुढे काहीही दिसत नाही..किती बिझी असतेस तू हल्ली" हे काही चालायचे नाही..सुट्टी टाक चार दिवस आपण सगळे मिळूनच जाऊया.. मुलांच्या आग्रहापुढे मात्र तिचा नाईलाज झाला आणि चार दिवस का होईना पण ऑफिस चे टेन्शन विसरून तिने पण मस्त न्यू इयर एन्जॉय केलं.
एरवी रेवाच्या बिझी वेळा पत्रकामुळे बऱ्याचदा तिचे आई बाबांशी पण फोन वर कमी बोलणे व्हायचे मग आई पण तिला रागवायची. कित्येक वर्षात तिच्या मैत्रिणींना ती भेटली नव्हती..कशाला म्हणून कशालाच तिला वेळ नव्हता..तिच्या त्या ऑफिसच्या कामातच ती गुंतून पडे..त्यापुढे जगणे काय असते याचा तिला विसरच पडला होता..वर्ष भरभर सरत होते.
जेव्हा २०२० उजाडले व कोरोनामुळे सगळे जीवन ठप्प झाले.. सगळीकडे लॉक डाऊन सुरू झाले.. आता हे प्रकरण काही लवकर संपायचे नाही याची सगळ्यांना हळूहळू खात्री झाली..आणि मग सगळी कामे घरूनच ऑनलाईन व्ह्ययला लागली..कधी नव्हे ते रेवा, सलील आणि मुले एका छताखाली सबंध दिवस एकत्र राहायला लागली.
सुरुवातीला हा निवांतपणा सगळ्यांनाच खूप भावला..पण अचानक कोरोना चे नकळत घरी आगमन झाले..इतकी सगळी काळजी घेऊनही कोरोना ने घरी हजेरी लावली..सुदैवाने मुलांना काहीही त्रास झाला नाही..सलील आणि मुग्धाला मात्र ताप आणि सर्दी खोकल्याचा बराच त्रास सहान करावा लागला.. चौघेही घरातच quarantine झाले..पण अश्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी खूप मदत केली..किराणा दुकानदार, फळ,भाजीवाले सगळे अगदी धावून आले..कसलीही अडचण आली नाही..
हेच तर आपल्या देशाचे वैशिष्ट्य..या महामारीमुळे जेव्हा इतर प्रगत देशात सगळी यंत्रणा विस्कळीत झाली.. मॉल्स बंद पडले..तेव्हा आपल्याकडे मात्र छोट्या छोट्या दुकानदारांनी सगळे सामान आपल्याला पुरवले..सगळे एकमेकांच्या मदतीला हजर होते.. त्यामुळेच त्या संकटातून ते सगळे सुखरूप बाहेर आले.. ते दिवस अनुभवल्यावर मात्र ती जीवनाचा नवीन धडा शिकली. तिला कळले की, जिवंत असणे याहून दुसरी मोठी गोष्ट नाही..चांगले आरोग्य याशिवाय दुसरे कुठले सुख नाही आणि आपली माणसे जवळ असणे याहून दुसरा कसला आनंद नाही.
कोरोना मुळे तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. रेवा ने ठरविले की यापुढे ती आपल्या फॅमिलीला जास्तीत जास्त वेळ देणार..आईबाबांना वरचेवर भेटणार..आपल्या मैत्रिणींना काँटॅक्ट करून त्यांना नियमित भेटणार..आपल्या परिवाराची आणि आपल्या तब्येतीची नीट काळजी घेणार...नवनवीन जागी फिरायला जाणार..निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटणार..
यापुढे ती कुणालाही आणि कोणतीही गोष्ट गृहीत धरणार नव्हती..फक्त स्वतः चा विचार न करता आपल्याकडून दुसऱ्यांना होईल तितकी मदत करायची असे तिनें ठरवले.. प्रत्येक लहान सहान गोष्टीतला आनंद ती उपभोगणार होती..आपल्या कामाबरोबरच ती इतरांना पण भरभरुन वेळ देणार होती..आनंदाचे छोटे छोटे क्षण ती टीपणार होती..आयुष्य हे खूप सुंदर आहे...हे आनंदाने जगण्यासाठी आहे.. तेव्हा यापुढे जीवनाच्या सुंदर गीताचा ती भरभरुन आस्वाद घेणार होती.
कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडल्यास नक्की लाईक आणि नावासकट शेअर करा आणि तुमचे मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा.
धन्यवाद.
