STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

आनंद

आनंद

1 min
183

   *आनंद ही अनुभूती आहे.जी प्रत्येक मानवात ,सजीवात मनाच्या कुपीत दडलेली आहे.ती एक अभिव्यक्ती आहे.*

    *मी सजीव म्हटलं याचं कारण वृक्षवेली याही सजीव आहेत.तर यांनाही वार्‍यासंगे डोलताना,लहरताना,नृत्यात मग्न होताना आपण पाहतो.ही अभिव्यक्ती आपल्याला समजून घ्यावी लागते.*

   *मानव हा निसर्ग,कुटुंब,समाजात रमणारा प्राणी आहे.मानव आनंद ही अभिव्यक्ती अगदी छोट्या छोट्या कारणातून व्यक्त करत असतो.व्यक्त होतो.*

   *शिक्षकांनी छान हा शाबासकीचा शब्द मुलांना वापरताच मुले आनंदी होतात. मुलांच्या अक्षराला एखादा स्टार दिला तरी आनंद होतो. खेळताना जिंकले की होणारा आनंदतर अवर्णनीय आहे.*

   *नोकरी मिळणारा आनंद,ती कायम झाली म्हणून मिळणारा आनंद, प्रमोशन झाले म्हणून मिळणारा आनंद.मित्रांना पार्टी देताना होणारा आनंद,त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून होणारा आनंद....असे किती किती सांगू बर!!*

    *लहान मुलाची झालेली प्रत्येक पहिली क्रिया मनाच्या एका कोपर्‍यात साठवली जाते.ती परत परत जागेपणी स्वप्नात अनुभूती घेताना होणारा आनंद शब्दात सांगताच येणार नाही.*

   *आई होताना झालेला त्रास ...पण आपल्या बाळाला पाहताच क्षणात त्रास विसरून झालेला तो नयनात दिसणारा आनंद...अवर्णनीय अगदी!*

    *वृद्धांना तर त्यांच्याशी नुसते कोणी बोलले तरी तो आनंद त्यांच्या चेहर्‍यावर झळकत असतो.कारण त्यांच्याशी बोलायला हल्ली वेळ नसतो न या पिढीला....*😔

   *अशी आनंदाची अगणित उदाहरणे देता येतील,अगदी सिग्नलला गाडीपुसून दिल्यावर गाडीच्या मालकाने मुलाला दिलेली एक दहाची नोटही त्याच्या जीवनात आनंद आणते.*

   *गरीबाघरी रोज व्यवस्थित खायला मिळाले तरी तो आनंदात असतो.*

   *आनंद या जीवनाचा*

    *सुगंधापरी ओघळावा*

   *जसा सुगंध वार्‍याच्या दिशेला वाहत जातो.तसे आनंद हा जीवनाचा सुगंधासमान वार्‍यावर पसरत जावा.तो सर्वांना घेता यावा*

   *आनंद द्यावा अन् घ्यावा*


Rate this content
Log in