STORYMIRROR

Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

आजची स्त्री

आजची स्त्री

1 min
150


  स्त्री ...स्त्री म्हणजे आई, पत्नी, बहीण, मामी, नानी, आजी, काकी, शिक्षिका अशी किती विविध नाती सांगू मी... स्त्री ही क्षणिक पत्नी अनंतकाळची माऊली असते. स्त्री खंबीर व्यक्तिमत्व आहे. तशीच ती अत्यंत कनवाळू, भावूक, हळवी आहे. वेळ असल्यास चंडिकेचा अवतार धारण करते, आज स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगात वावरताना दिसते. कुटुंबाची जबाबदारी पेलते. मुलांचे संगोपन संस्काररूपी मूल्याने करते. घरदार, नोकरी सांभाळते. परंपरा जपते. सणवार करते. मुलांना परंपरा म्हणजे काय शिकवते. शिक्षणासाठी खटाटोप क

रते. अशा अनेक गोष्टी आजची स्त्री समर्थपणे पेलताना दिसते, त्यातूनही उसंत मिळाली की स्वतःचे छंद जोपासते.

  

आईबाबांची लाडाची लेक सासरची बहुराणी बनते. पतीची पट्टराणी होते. मुलांच्या विश्वात छान रमते... अशी ही स्त्री... अनंत उपकार आहेत हिचे या सृष्टीवर तिला मानाचे स्थान मिळावे इतकीच इच्छा आहे. तिचा वारंवार पाणउतारा होणार नाही याकडे कुटुंबाने, समाजाने लक्ष द्यावे. अशी ही वंदनीय नारी अबला नाही तर सबला आहे, हे सर्वांनीच जाणावे.


नमन माते तुला या एका मातेचे...


Rate this content
Log in